मुख्य सामग्रीवर वगळा

राष्ट्रघडणीसाठी मनुष्यघडण आणि शिक्षण

 डॉ. मिलिंद नाईक
प्राचार्य, ज्ञान प्रबोधिनी प्रशाला
इ तिहास सांगतो की योग्य शिक्षणामुळे महान व्यक्ती घडल्या, समाज संघटित झाले आणि राष्ट्र उभी राहिली. शिक्षणाने माणसाला केवळ कुशल कामगार बनवले नाही, तर सजग नागरिक, संवेदनशील समाजघटक आणि राष्ट्रासाठी समर्पित व्यक्ती घडविल्या. परंतु शिक्षणाची सद्यःस्थिती काय दर्शवते? शिक्षण हे केवळ उपजीविकेचे साधन मानण्याइतपत आपण आज संकुचित झालो आहोव, ही अतिशय चिंताजनक बाब आहे.
एका बाजूला स्वामी विवेकानंदांच्या शब्दात सांगायचे तर "शिक्षण म्हणजे मनुष्यातील उत्तमतेचे प्रकटीकरण" अशा मोठ्या, उदास घोषणा केल्या जातात; परंतु त्यांचे व्यवहारातील प्रतिबिंव फारसे दिसत नाही आणि दुसऱ्या बाजूला शिक्षणाचा हेतू केवळ अक्षरओळख, संख्याज्ञान आणि रोजगारक्षम कौशल्ये इतकाच मर्यादित ठेवून ती पूर्णपणे व्यवहारिक चौकटीत अडकवला जातो.
कधी भारतीय शिक्षणव्यवस्था व तत्त्वज्ञान श्रेष्ठ आणि पाश्चात्त्य टाकाऊ असे ठामपणे मांडले जाते; तर कधी भारतीय विचार स्वीकारल्यामुळे आपण हकारी वर्षे मागे गेलो, असा आरोप केला जातो. या दोन्ही टोकाच्या भूमिकांमध्ये विवेक, समन्वय आणि वास्तवतेचा अभाव जाणवतो. स्वामी विवेकानंदांनी यायावत अत्यंत स्पष्ट भूमिका मांडलेली आहे अध्यात्म आणि ईश्वरचिंतनाच्या बाबतीत आपण भारतीयांतील भारतीय असले पाहिजे; मात्र विज्ञान, तंत्रज्ञान आणि शास्त्रीय दृष्टिकोन यांच्या बाबतीत
आधुनिकातील आधुनिक असले पाहिजे. औद्योगिक क्रांतीनंतर पाश्चात्त्य देशांमध्ये माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मूलतः बदलला. मनुष्यघाडणीमागील साध्य-साधन विवेक हरपला. मनुष्य हा उत्पादन
वापरणारा आणि उत्पादन वाढविण्याचे साधन बनला, त्याच्या इच्छा-आकांक्षा भौतिक सुखसमृद्धीभोवतीच फिरतात, असा समज दूढ केला गेला. शिवाय औपचारिक शिक्षणपद्धतीही वस्तू उत्पादनाच्या, एकाच एक साच्यातून मूर्ती घडविण्याच्या धर्तीवर रचली गेली. तंतोतंत सारख्या कच्च्या मालावर तंतोतंत सारखी प्रक्रिया केली की जशी संतोतंत सारखी उत्पादने मिळतात, त्याच पद्धतीने सर्व मुलांसाठी एकसारखी शिक्षणव्यवस्था उभी करण्यात आली. प्रत्येक मूल वेगळे असते, त्याच्या क्षमता, मर्यादा वेगळ्या असतात, हे मूलभूत सत्य विसरले गेले. सगळ्यांना सारखे शिक्षण हा न्याय नसून, तो प्रत्यक्षात अन्याय आहे, याचे भान राहिले नाही. साचेबद्ध शिक्षणपद्धतीतून एकसारख्या मूर्ती घडविण्याचा प्रयोग अखेरीस निरुपयोगी ठरत आहे.
औपचारिक शिक्षणाची अंतिम उरिटे माणूस घडवणे, समाज सुसंस्कृत करणे आणि राष्ट्र बळकट करणे ही कालातीत आहेत आणि वादातीतही। मात्र त्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी वापरली जाणारी साधने, अभ्यासक्रम आणि अध्यापन पद्धती समाजबदलानुसार बदलणे अपरिहार्य आहे. आज समाजबदलाचा वेग इतका प्रचंड वाढला आहे की दर काही वर्षांतच नवी पिढी वेगळ्या गरजा, अपेक्षा आणि आव्हानांसह समोर येत आहे. अशा परिस्थितीत शिक्षणव्यवस्थेने स्वतःमध्ये आवश्यक ते बदल घडवून आणले नाहीत, तर ती अप्रासंगिक ठरण्याचा धोका नाकारता येत नाही. दुर्दैवाने, सध्याचे चित्र पाहता आपण त्या धोक्याच्या अगदी उंबरठ्यावर उभे आहोत, असे म्हणावे लागेल.
शिक्षण हा विषय जितका जुना आहे, तितकाच तो सतत नव्याने विचार करण्याची गरज असलेला आहे. म्हणूनच शिक्षणाच्या उरिष्टांवर लक्ष केंद्रित करून सर्व घटकांचा समन्वय साधत, काळाच्या गरजेनुसार शिक्षणव्यवस्थेत कोणते बदल आवश्यक आहेत, पावर गांभीयनि चिंतन करण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यासाठीच ही लेखमाला। सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते