मुख्य सामग्रीवर वगळा

आटपाडीत साद्य फाउंडेशनकडून आशा सेवेकेंचा गौरव

आटपाडी - ग्रामीण भागात सामान्य नागरिक आणि आरोग्य यंत्रणा यांच्यातील महत्त्वाचा दुवा असलेल्या आशा सेविकांचा सन्मान येथील साध्य फाउंडेशनने केला. साध्य फाउंडेशनच्या संस्थापिका ॲड. विद्याताई मोटे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने आटपाडी तालुक्यातील आशा सेविकांना खास त्यांच्याच जीवनावर बनवलेला 'आशा' हा प्रेरणादायी चित्रपट दाखवला.
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सौ. साधना पवार, विजय देवकर आणि आरोग्य विभागातील इतर मान्यवर उपस्थित होते.
आरोग्य विभागातील शेवटचा घटक असूनही तळागाळातील लोकांपर्यंत शासकीय योजना आणि आरोग्य सेवा पोहोचवण्याचे कठीण काम आशा सेविका करत असतात. त्यांच्या याच कामाची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नुकताच प्रदर्शित झालेला आणि त्यांच्याच जीवनावर आधारित 'आशा' हा सिनेमा दाखवण्यात आला.
याप्रसंगी बोलताना साध्य फाउंडेशनच्या अध्यक्ष ॲड. विद्याताई मोटे यांनी "आशा सेविका या ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा कणा आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव करणे हे समाजाचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन केले.  तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनीही आशा सेविकांच्या कामाचे कौतुक करून या उपक्रमाबद्दल साध्य फाउंडेशनचे आभार मानले.
या आगळ्यावेगळ्या सन्मानामुळे तालुक्यातील आशा सेविकांनी आनंद आणि समाधान व्यक्त केला. तसेच चित्रपट पाहून आपल्याला कामाप्रती नवी ऊर्जा मिळाल्याची भावना व्यक्त केली. या कार्यक्रमाला तालुक्यातील आरोग्य विभागातील कर्मचारी आणि मोठ्या संख्येने आशा सेविका उपस्थित होत्या.              

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते