मुख्य सामग्रीवर वगळा

ध्येय काय आहे?

जीवनमान-जीवनभान
देवयानी एम. लाइफस्टाइल कोच
ध्येय आहे का?
व याच्या साधारण ३५ ते ४० वर्षांपर्यंत आपण खूप व्यस्त असतो. शिक्षण, मित्रमंडळी, नंतर नोकरी मिळवणे किंवा व्यवसाय उभा करणे, लग्न, मुलं, स्वतःचं घर घेणं, जरा प्रवास करून स्वतःच्या पैशांनी थोर्ड का होईना जग बघणं, ईएमआय सुरळीत चालू राहणं.. इत्यादी. ज्याला आपण सेटल होणं म्हणतो ते करत असताना अडचणी जरी आल्या, तरी ते आव्हान स्वीकारण्याची ताकदही असते आणि गरजसुद्धा. पर्यायच नसतो! आयुष्याला खूपच वेग असतो, त्यामुळे वेगळा विचार करायला वेळच नसतो- किंबहुना विचार येतच नाही. मेंद ऑक्युपाइड असतो कारण आपण आयुष्य उभं करण्याचा डोंगर चढत असतो. ते उभं करताना पैसा, नाती आणि आयुष्याचा बेसिक आत्मविश्वास तयार होत असतो, की आपण आई-वडिलांशिवाय स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो.
हे सगळं स्थिरस्थावर झालं, की काहीतरी बदलतं. हा डोंगर चढून झाला, की एक प्रकारची पोकळी जाणवू लागते. कारण जरी अजून पैसे कमवायचे असले, अजून मुलं मोठी होत असली, अजून प्रवास करायची इच्छा असली तरी हे सगळं आता रिपिटिशन असणार आहे. फारसं वेगळं किंवा आव्हानात्मक असं काही राहिलेलं नसतं. आता उरलेलं होत राहणार आहे. जे आजवर केलं ते जरी नाकासमोर करत राहिलो तरी उर्वरित सगळं नीट पार पडेल याची शाश्वती असते. आयुष्यावरची बेसिक पकड आलेली असते.
त्यापुढे मात्र पोकळी जाणवते, कारण बहुतांशवेळा पुढचा डोंगर नौट सापडत नाही. १५ ते २० वर्षांच्या लढाईनंतर पुढचं आव्हानच मिळत नाही आणि मग
उत्तर सापडलं नाही की हरवल्यासारखं वाटू लागतं. या काळात शरीरातही बदल होऊ लागतात, मी कोण आहे, माझी खरी ओळख काय असे प्रश्न पडू लागतात. आजवर जे कमवलं, मिळवलं, जी धडपड केली ती इथवर पोहोचण्यासाठी गरजेची होती. मात्र, आता त्याच गोष्टी आनंद आणि समाधान देत नाहीत असं वाटू लागतं. याचं कारण पैसा, घर, गाडी, सोनं, प्रवास, लग्न, प्रेम ही आयुष्याची ध्येयं असू शकत नाहीत. ती सर्व जीवन जगताना लागणारी साधनं व गरजा आहेत.
उदाहरणार्थ, प्रवासाला जाताना आपल्याला जायचंय कुठे हे माहीत असणं महत्त्वाचं आहे. भरलेली बॅग, पाण्याची बाटली, खाऊ, एटीएम कार्ड, मोबाइल फुल चार्ज केलेला इत्यादी ही सर्व प्रवासाची आवश्यक साधनं आहेत, 'डेस्टिनेशन' नाही.
तसंच सोमवार ते शुक्रवार काम आणि वीकएंडला
रिलॅक्स करणं इतकंच आयुष्य असू शकत नाही. ते झालं फक्त सर्व्हयवल, जिवंत आहोत म्हणून जगतोय असं नसावं, नाही का? त्यातच जर अडकून राहिलो तर व्यक्तिमत्त्व खूप उथळ आणि बहिर्मुख होऊन बसेल. आज-उद्यापुरता दृष्टिकोन बनेल आणि अर्ध्या वाटेत हरवल्यासारखं वाटू लागेल. जरा झुमआउट करून आपल्या आयुष्याचा पट मांडून पाहिला, तर वेगळी उत्तरं मिळतील. मात्र, अट ही आहे की प्रश्न पडले पाहिजेत, आणि आपल्याला असे आयुष्याबद्दलचे प्रश्न पडू लागले आहेत हे स्वीकारायची तयारी हवी.
आज नवीन वर्षाच्या सुरुवातीला विचार करूया. जगतोय म्हणून जगतोय की माझ्या जगण्याला काही ध्येय आहे?
ध्येय कसं शोधायचं ?
अशा टप्प्यावर आयुष्याला पुन्हा दिशा देणारा एक साधा पण खोल विचार म्हणजे 'उपयुक्तता'. जौवनाचा अर्थ 'उपभोगात' नाही, तर 'उपयोगात आहे. मी 'कोणासाठी तरी, कशासाठी तरी' उपयोगी आहे या भावनेनं पोकळी हळूहळू अर्थपूर्णतत बदलू लागते. उपयुक्तता म्हणजे स्वतःला झिजवून सेवा करणं नव्हे, तर आपल्याकडील अनुभव, ज्ञान, वेळ आणि संवेदनशीलता यांचा उपयोग इतरांसाठी होणं. इतरांसारखं स्वतःसाठीही हे करणं आवश्यक आहे. स्वतःची क्षमता वाढवणं, विवेक विकसित करणं यालाही प्राधान्य असावं. जेव्हा स्वतःची उन्नती आणि इतरांसाठीची उपयुक्तता एकत्र येतात, तेव्हा जगणं केवळ चालू राहत नाही तर अर्थपूर्ण होतं.

टिप्पण्या