डॉ. विद्याधर बापट,
मानस तज्ज्ञा
यश शस्वी करिअर झालं असं आपल्याला केव्हा म्हणता येईल तर झेपेल, रुचेल अशा व्यावसायिक पदवीची, करिअरची निवड आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे व्यक्तिमत्त्व विकास, तो योग्य न झाल्यास कुठल्याही विद्यापीठाची कितीही मोठी पदवी मिळाली तरी समृद्ध आयुष्य जगायला ती अपुरीच पडते. मुळात करिअर करायचं कशासाठी, तर बुद्धिमत्तेला, स्वतःतल्या क्षमतांना न्याय देण्यासाठी. पैसा, प्रतिष्ठा ही उद्दिष्ट ओघानं येतात. लहानपणापासून विकासाची सुरवात होते. तारुण्यावस्था, विशेषतः महाविद्यालयीन जीवनात विशाल आकाश आपल्यासाठी मोकळं होतं. आपल्यातला 'मी' मोकळ्या आकाशात छानपैकी विहरू शकण्यासाठी आपल्या पंखात आवश्यक ते बळ निर्माण होण्याची हीच वेळ असते. आव्हानांना सामोरं जाण्याची आणि विनाशाकडे नेणारे मोह टाळण्याची शक्ती याच काळात निर्माण होऊ शकते. हा काळ एका अर्थानं स्वातंत्र्याचाही असतो. त्यात स्वैराचाराकडे झुकण्याची शक्यता असते. प्रचंड ऊर्जा ओसंडून वहात असल्याने काळजीपूर्वक पावलं टाकणं महत्त्वाचं असतं. कुठले मोह आपण
राळायला हवेत आणि कोणती बलस्थानं आहेत हे ओळखणं महत्त्वाचं. मेंदूच्या सकारात्मक कार्याची तयारी या काळात होते. त्याच्या पायावर आनंदी आणि कणखर मन उभं राहू शकतं. त्यावरच समृद्धीचे सहा सोपान म्हणजे शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य, आसपासच्या माणसांबरोबरच पशुपक्षी आणि एकूणच निसर्गाबरोबरचं निकोप नातं, पुरेसा पैसा, आनंद मिळवण्याची कला आणि निरंतर समाधानी अवस्था साध्य होतात.
यासाठी मेंदूला विशिष्ट गोष्टी करण्याची शिस्त लावावी लागते. यश अपयशापेक्षा, शंभर टक्के प्रयत्न करणे आणि प्रयत्न करण्याच्या प्रक्रियेचा आनंद घेणे हेच महत्त्वाचे आहे हीच मनाची आयुष्यभरासाठी धारणा बनायला हवी.
या काळात मिळवण्याच्या महत्त्वाच्या
गोष्टी अर्थात बलस्थानं :
शारीरिक क्षमतेचा विकास
व्यक्तिमत्त्व विकास
नियमित अभ्यास आणि एकाग्रता
सर्व प्रकारच्या व्यसनांपासून आणि अनैतिक गोष्टींपासून दूर रहाणे.
कलाकौशल्य, क्रीडानैपुण्य, नेतृत्वगुण, चांगले मैत्र
महाविद्यालयीन जीवनात आवश्यक व पुढील जीवनात उपयोगी अशी आवश्यक व्यवस्थापकीय कौशल्ये
व्यक्तिमत्त्व विकास
व्यक्तिमत्त्व विकास म्हणजे केवळ
भौतिक यश, भरपूर पैसा मिळवण्याची, नावलौकिक मिळवण्यासाठीची क्षमता नाही. या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच परंतु त्याचबरोबर चांगला, जबाबदार नागरिक होणं, समाजाप्रती संवेदनशील बनणं, कोणत्याही परिस्थितीत शांत, आनंदी राहू शकणारं सकारात्मक आणि कणखर व्यक्तिमत्त्व बनणं महत्त्वाचं, असं व्यक्तिमत्व विशिष्ट प्रयत्नांनी मिळवता येतं. मनाच्या व्यायामशाळेसाठी निर्माण केलेल्या काही व्यायामांनी हे साध्य होऊ शकतं. या व्यायामाचं उद्दिष्ट काय असावं? तर दोन दिशांनी व्यक्तिमत्त्व विकसित व्हावं. एक दिशा बाहेरच्या जगात यशस्वी होण्यासाठीची तंत्रे, व्यायाम शिकवणारी तर दुसरी आंतरिक स्वस्थतेसाठीची साधना शिकवणारी. म्हणजेच आतलं विश्व शांत, स्वस्थ आणि आनंदी बनवणारी. हे जमलं की व्यक्तिमत्त्व विकास झाला असं म्हणता येईल.
या सगळ्याची सुरवात करावी लागते ती व्यक्तिमत्त्वामधील, स्वभावामधील, विचार करण्याच्या पद्धतीतील दोष दूर करून. काल्पनिक भीती, स्वतः विषयीच्या चुकीच्या,
Sangli, Sangli Today 07/01/2026 Page No. 7
Ω
नकारात्मक कल्पना, जगाविषयीच्या आणि जगण्याविषयीच्या चुकीच्या कल्पना, व्हिडिओ गेम्स वा मोबाईलच्या अतिरिक्त आहारी जाणं, आसपास घडणाऱ्या घटनांचा नकारात्मक प्रभाव नाहीसा करावा लागतो. आधीपासून असलेल्या चांगल्या गोष्टींची मशागत करून व्यक्तिमत्त्व विकासात त्याचा उपयोग करून घ्यायचा असतो.
व्यक्तिमत्त्व विकासातील महत्त्वाची साध्ये
१ माझे परीक्षेतले गुण, खेळातील किंवा कुठल्याही बाबतीतील यश-अपयश यापेक्षा माझ्या शंभर टक्के प्रयत्न करण्यातला, प्रक्रियेतला आनंद महत्त्वाचा आहे. मी प्रत्येकवेळी पूर्ण झोकून देऊन प्रयत्न करावेत. त्याचं फळ बहुतेक वेळा चांगलंच मिळेल. चुकून अपयश आलंच तर मी दुःख करीत बसण्यापेक्षा आत्मपरीक्षण करेन. निराश न होता पुन्हा सकारात्मक प्रयत्न करेन. हे तत्त्वं मी आयुष्यभर पाळेन, ते माझ्या विचारसरणीचा भाग होईल.
माझं 'आतलं' विश्व मी कायम २ शांत, स्वस्थ, आनंदी आणि कणखर
ठेऊ शकतो. आयुष्यात घडणाऱ्या विपरीत घटना, अपयश हा आयुष्याच्या खेळातला एक भाग आहे. मी ते शांतपणे स्वीकारीन.
आयुष्य सुंदर आहे. प्रत्येक क्षण ३ चांगल्या पद्धतीने आनंदाने व्यतीत करण्याची, उपभोगण्याची कौशल्ये मिळवता येत्तील,
मी स्वतः आनंदी राहण्याचा प्रयत्न ४ करेन. तसेच माझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आनंद देण्याचा प्रयत्न करेन, मी चांगली मूल्ये जोपासीन व कुठल्याही प्रलोभनांना बळी पडणार नाही.
५ माझ्यातील बलस्थाने ओळखून त्या द्वारे स्वविकास करेन.
६ प्रत्येक सजीव व निर्जीव गोष्ट महत्त्वाची आहे. मी आत्मसन्मान ठेवला पाहिजे इतरांचाही आदर राखावा. पुढील भागात या दिशेने प्रयत्न कसे करायचे यावर प्रकाश टाकणार आहोत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा