नागेश गायकवाड सकाळ वृत्तसेवा आटपाडी ता. 2- यंदा निसर्गाचा लहरीपणा आणि अतिवृष्टीचा मोठा फटका डाळिंब बागांना बसला. त्यामुळे डाळिंबाची आवक घटली आहे. पुरवठा कमी आणि मागणी जास्त असल्याने डाळिंब दराच्या गोडीत विक्रमी वाढ झाली आहे. डाळिंब इतिहासातील भाव सध्या उच्चांकी स्तरावर पोचले आहेत. शेतकऱ्यांसाठी ही दरवाढ दिलासादायक ठरली आहे. पुणे येथील गुलटेकडी बाजार समितीच्या सौदे बाजारात संजय अनपट यांच्या अडतीवर सांगोला तालुक्यातील नवनाथ बजबळकर यांच्या डाळिंबाला पहिल्या राशीला विक्रमी 630 तर सरासरी विक्रम 352 रुपये भाव मिळाला. तर बागेत 225 ते 260 रूपये दर चालू आहेत. यात गेल्या दोन दिवसात 40 ते 60 रुपये प्रति किलो वाढ झाली आहे.
सध्या डाळिंब बागाचा शोध घेऊन व्यापाऱ्यांकडून खरेदी सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांच्या बागेत सरासरी 225 रुपये प्रति किलो या दराने व्यवहार गेल्या चार दिवसांपुर्वी सुरू होते. यात नवीन वर्षाच्या पहिल्या दोन दिवसात आणखी वाढ झाली आहे. सध्या जुलैमध्ये हंगाम धरलेल्या बागांतील डाळिंब विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे मात्र अशा बागा फारच कमी आहेत. स्थानिक बाजारपेठेलाच डाळिंब कमी पडत आहे.
*पुणे मार्केटमध्ये लिलावाचा नवा उच्चांक*
पुणे येथील गुलटेकडी बाजार समितीमध्ये डाळिंबाच्या दराने गेल्या आठवड्यापासून दरात रोज वाढ सुरू आहे. येथील संजय अनपट यांच्या लिलाव पेढीवर नाना बंडगर यांनी काढलेल्या लिलावात सांगोला तालुक्यातील शेतकरी नवनाथ बजबळकर यांच्या डाळिंबाला अभूतपूर्व भाव मिळाला.
पहिली रास 630 रुपये प्रति किलो,दुसरी रास 405, तिसरी रास 354, चौथी रास 330 आणि पाचवी रास 293 रुपये प्रति किलो तर
एकूण लिलावात सरासरी 352 रुपये इतका उच्चांकी दर मिळाल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. एक तारखेला नवनाथ बजबळ यांच्याच डाळिंबाला सरासरी 300 रूपये भाव मिळाला होता. त्यात पन्नास रूपयांची वाढ झाली. आटपाडीतील प्रगतशील शेतकरी विजय मरगळे यांच्या डाळिंबाला गेल्या पंधरा दिवसांपूर्वी विक्रमी 251 रुपये भाव मिळाला होता. सध्या यात वाढच झाली आहे.
*का वाढलेत दर?*
बेसुमार पावसामुळे डाळिंबाचे उत्पादन, फुगवण आणि गुणवत्तेवर प्रतिकुल परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी बागांचे नुकसान झाल्याने डाळिंबाची कमतरता निर्माण झाली आहे. सणासुदीचे दिवस आणि आरोग्यदायी फळ म्हणून वाढलेली मागणी यामुळे दरात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. डाळिंबाच्या दरातील या 'गोडी'मुळे नुकसान सोसणाऱ्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक आधार मिळत आहे. "मागणी जास्त आणि मालक कमी त्यामुळे दर वाढलेत. शेवटपर्यंत असेच जर राहतील. आमच्या अडतीवर पारदर्शी व्यवहार होऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव मिळतो." नाना बडगर मो.न. .9096494936
💐💐
उत्तर द्याहटवा👍🏻
उत्तर द्याहटवा