मुख्य सामग्रीवर वगळा

*माणुसकीचा 'पायगुण'! बाळेवाडीच्या आजींनी विद्याताईंना दिला काळजाला भिडणारा आशीर्वाद*

आटपाडी-"लोक म्हणतात देव कुठे दिसत नाही, पण खरा देव अशा साध्या माणसांच्या रूपातच रस्त्यावर उभा असतो," याची प्रचिती नुकतीच बाळेवाडी भागात जनसंपर्कासाठी जात असताना सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई यांना आली. भरउन्हात रस्त्याकडेला मदतीच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या एका आजींना लिफ्ट देऊन विद्याताईंनी केवळ कर्तव्यच पार पाडले नाही, तर एका वृद्ध माऊलीचा निखळ आशीर्वादही मिळवला. *नेमकी घटना काय*
करगणीपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या बाळेवाडी फाट्यावर एक वृद्ध आजी उन्हात वाकून गाडीला हात दाखवत उभ्या होत्या. बाळेवाडी हे आटपाडी तालुक्यातील दुर्गम गाव असून, तिथे एसटी बसची सोय नसल्याने ग्रामस्थांना खाजगी वाहनांचा किंवा लिफ्टचा आधार घ्यावा लागतो. बाळेवाडीच्या दिशेने जात असताना विद्याताईंनी आपली गाडी थांबवली आणि आजींना सन्मानाने गाडीत बसवले.
माझ्या मुलीसारखी धावून आलीस गं!
गाडीत बसल्यावर आजींनी गप्पांना सुरुवात केली. "मघापासनं लय गाड्यांस्नी हात केलं वं, पर कुणी बी थांबवली न्हाय... तुमी माझ्या मुलीसारखी धावून आला वं," असे म्हणताना आजींच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे भाव होते. करगणीचा बाजार करून त्या घराकडे निघाल्या होत्या. गप्पांच्या ओघात आजींचे घर आले. वय झाले तरी तीक्ष्ण नजर असलेल्या आजींनी लांबूनच आपले घर ओळखून गाडी थांबवायला सांगितली. *"तो आशीर्वाद आणि दाटलेला कंठ...*
गाडीतून उतरताना आजींनी आपल्या सुरकुतलेल्या हातांनी विद्याताईंना स्पर्श केला आणि म्हणाल्या, "माझा पायगुण लय चांगला हाय बघा.. तुमचं लय चांगलं होईल, हिच्यापेक्षा मोठी गाडी घेचाल!" आजींचे हे साधे पण काळजातून आलेले शब्द ऐकून विद्याताईंचा कंठ दाटून आला. आजींनी मोठ्या मायेने चहा पिण्यासाठी घरी बोलावले, मात्र कामाची घाई असल्याने विद्याताईंनी पुढच्या वेळी येण्याचे आश्वासन दिले.
*गाडीला माणुसकीचा ब्रेक लागणारच!*
गाडी पुढे निघाल्यावरही आरशातून आजी डोक्यावरचा पदर सावरत आशीर्वाद देताना दिसत होत्या. या अनुभवाबाबत बोलताना विद्याताई म्हणाल्या की, "उद्या आपल्याकडे मोठी पदे किंवा मोठी गाडी आली, तरी अशा गरजूंना पाहून आपल्या गाडीला माणुसकीचा ब्रेक लागणारच. आजींचे ते शब्द आणि तो स्पर्श कोणत्याही मोठ्या पुरस्कारापेक्षा मोलाचा आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते