मुख्य सामग्रीवर वगळा

करगणीत घडला आहे धक्कादायक प्रकार,,,,

आटपाडी - करगणी ता आटपाडी येथे आटपाडी- सांगली या मुख्य रस्त्यावर ग्रामपंचायतीसमोर असलेले बस स्थानक अज्ञातानी पूर्णपणे काढून टाकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. काढलेले बसस्थानक योग्य ठिकाणी बसवावे, अशी प्रवासी वर्गातून मागणी होत आहे.                  करगणी ता. आटपाडी येथे राजपत कंपनीने 
ग्रामपंचायत आणि श्रीराम माध्यमिक महाविद्यालयासमोर बस स्थानके उभारली होती. भिवघाट, विटा आणि सांगलीकडे जाणारे प्रवासी ग्रामपंचायती समोरील बस स्थानकाचा वापर करत होते. या बस स्थानकात बसणाऱ्या प्रवासी आणि शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न काही दिवसापासून ऐरणीवर आला होता. हे स्थानक सुरक्षित नसल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती.              दरम्यान, सुरक्षिततेच्या कारणावरूनच अज्ञात व्यक्तीनी हे बसस्थानकच तिथून हटवले आहे. त्यामुळे आता प्रवाशांना उन्हात उभे राहून बसची वाट पाहावी लागत आहे. सध्या अहिल्यादेवी होळकर पुतळ्याशेजारी 'बस स्थानक' असा फलक लावण्यात आला आहे. मात्र, तिथे प्रवाशांना बसण्यासाठी कोणतीही बैठक व्यवस्था किंवा सावली उपलब्ध नाही. परिणामी ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांची मोठी कुचंबणा होत आहे. बस स्थानक काढलेल्या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.‌ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून बस स्थानक हटवल्याची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली असून अधिकृत परवानगीशिवाय सार्वजनिक सुविधा काढून टाकणे हा गुन्हा असल्याने, संबंधित विभागामार्फत अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
भरवस्तीतील आणि वर्दळीच्या ठिकाणचे बस स्थानक अशा प्रकारे गायब झाल्याने खळबळ उडाली  आहे. आता या प्रकरणी ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस काय कारवाई करतात आणि प्रवाशांना पुन्हा बसण्याची सुविधा कधी उपलब्ध होते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.                       

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते