निंबवडे ( विशेष प्रतिनिधी) - निंबवडे जिल्हा परिषद गटातील भाजपाच्या उमेदवार माधवीकाकी पडळकर यांनी आपला प्रचाराचा वेग प्रचंड वाढवला असून, त्यांनी 'पायाला भिंगरी' लावून संपूर्ण गट पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. घर टू घर गाठीभेटी आणि महिलांशी थेट संवाद यावर भर दिल्याने पडळकर यांना मतदारांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या या सक्रियतेने विरोधकांच्या गोटात मात्र धडकी भरली आहे. *प्रत्येक उंबरठ्यापर्यंत पोहोचण्यावर भर*
माधवीकाकी यांनी प्रत्येक गाव, वाडी आणि वस्तीवर लक्ष केंद्रित केले आहे. नुकत्याच त्यांनी विभुतवाडी, पारेकरवाडी, झरे आणि कुरुंदवाडी या गावांचा दौरा केला. केवळ सभांमधून भाषणे न देता, त्या प्रत्येक कुटुंबाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचत आहेत. घरातील महिलांशी संवाद साधून त्यांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेत आहेत. महिलांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण करण्यावर त्यांनी विशेष भर दिला असून, गावागावातील ज्येष्ठ महिलांचे आशीर्वाद त्यांना मिळत आहेत.
*तरुण आणि महिला शक्तीची मोठी साथ*
पडळकर यांच्या प्रचाराचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यासोबत असलेला महिलांचा आणि तरुणांचा मोठा फौजफाटा सोबत आहे. प्रचारादरम्यान प्रत्येक गावातून तरुण वर्ग उत्स्फूर्तपणे त्यांच्या रॅलीत सहभागी होत आहे. घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या या प्रत्यक्ष संवादामुळे गटात भाजपाची बाजू भक्कम होताना दिसत आहे. गटात माधवी पडळकर यांनी प्रचारात घेतलेली ही आघाडी आगामी काळात निवडणुकीचे चित्र पालटणारी ठरेल, अशी चर्चा रंगू लागली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा