मुख्य सामग्रीवर वगळा

टेंभूत भाजप नव्हे तर युती आणि अनिलभाऊंचा सिंहांचा वाटा

टेंभू सोबत सामान्य माणसानेच स्वर्गीय आमदार अनिल भाऊंचा नाव जोडलं आहे. त्यांनीच योजना मांडण्यापासून 2014 नंतर गती देऊन पाणी देण्याचे काम केलं आहे आणि राज्यात फक्त भाजपाची सत्ता नव्हती सोबत शिवसेना होती, असे प्रत्युत्तर आमदार सुहास बाबर यांनी विरोधकांना दिले. यावेळी त्यांनी युतीची सत्ता आणि स्वर्गीय आमदार अनिलभाऊ यांचाच टेंभू योजनेत सिंहांचा वाटा असल्याचा प्रबळ दावा केला.               नेलकरंजी ता. आटपाडी येथे प्रचार सभेनंतर झालेल्या पत्रकार बैठकीत आमदार सुहास बाबर यांनी टेंभू संदर्भात भाजप नेतेमंडळीकडून टेंभू योजना भाजपानेच मार्गी लावल्याचा दावा केला जात असल्याच्या प्रश्नावर मत व्यक्त केले. टेंभू सोबत स्वर्गीय आमदार अनिलभाऊ यांचे सर्वसामान्य माणसांनीच नाव जोडले आहे. कोणत्याही गावातील कोणत्याही माणसाला विचारलं तर टेंभू आणि अनिल भाऊ असंच तोंडातून नाव येत. कारण त्यांनीच योजना मांडली आणि गती देऊन पूर्णत्वाकडे नेहली. सांगलीत भाजपात प्रवेश केलेल्या मंडळींमध्ये अपवाद एखादा वगळता शिवसेनेचा कोणीही नव्हता. जे आमच्या विरोधात भूमिका घेत होते अशीच राष्ट्रवादीमधील मंडळी गेली आहे. त्याचा फारसा परिणाम होणार नाही."

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते