मुख्य सामग्रीवर वगळा

माणगंगेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेकडून षडयंत्र राबवले- अमरसिंह देशमुख यांचा आरोप

आटपाडीच्या माणगंगा कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून राजकीय षडयंत्र राबवल गेल. राष्ट्रवादी, शिंदे गटाची शिवसेना आणि शेकाप पक्षाच्या नेते मंडळींनी घात केल्याने आणि भाजपकडून बळ न मिळाल्याने कारखाना गेला. डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी अचानक अर्ज माघारी घेऊनन विश्वास घात केल्याची भावना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी व्यक्त केली.
माणगंगा कारखाना निवडणुकीतून उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडी संदर्भात त्यांनी पत्रकारांना माहिती दिली.  अमरसिंह देशमुख म्हणाले,' 1980 पासून बाबासाहेब देशमुख आणि गणपतराव देशमुख यांचे कारखान्याबाबत नैसर्गिक जिव्हाळ्याचे नाते निर्माण होते. तेव्हापासून सांगोला तालुक्यातून गणपतराव देशमुख आणि आटपाडी तालुक्यातून बाबासाहेब देशमुख उमेदवारी अर्ज भरत. यावेळीही गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी सांगोला तालुक्यातून आणि आम्ही आटपाडीतून अर्ज भरले. अर्ज माघारी घेण्याच्या दोन दिवस अगोदर चर्चाही झाली होती. मात्र अचानक दोन वाजता त्यांनी अर्ज माघारी घेत असल्याचे सांगितले. अर्ज भरण्यापूर्वीच निर्णय सांगितला असता तर आम्ही सांगोल्यातून उमेदवार उभे केले असते. अचानक शेवटच्या क्षणीची त्यांची भूमिका संशयास्पद असून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेचया दबावाखाली त्यांनी निर्णय घेतल्याचा आरोप केला. यामुळे बाबासाहेब देशमुख  आणि गणपतराव देशमुख यांच्या विचारांच्या नात्याला तिसऱ्या पिढीने तडा दिला. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून नेहमीच देशमुख कुटुंबावर अन्याय केला आहे. आम्ही राष्ट्रवादीत असताना पक्षासोबत राहूनही अपेक्षितच ठेवले. भाजपात गेल्यावरही जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आमच्यावर सुड घेण्याचे काम केल्याचा आरोप जयंत पाटील यांचे नाव न घेता केला.
 ते म्हणाले,"विरोधकांनी कारखान्याचे खाजगीकरण केले जाणार असल्याचा खोटा प्रचार केला. खरे तर जिल्हा बँकेने कारखाना विक्रीची निविदा काढली होती. त्यावेळी आम्ही आणि इतर कोणीच निविदा भरली नाही. नंतर बँकेने कारखाना चालवायला देण्याची निविदा काढली होती. त्याचे आम्ही टेंडर भरले होते. त्यावेळीही बँकेने तीन महिने निवीदा न उघडतास पैसे परत केले. बँकेतून कारखाना सुरू होणार नाही याचे राष्ट्रवादीच्या नेते मंडळींनी षडयंत्र रचले होते.
आमदार अनिल बाबार यांची भुमिका सौम्य होती. निवडणुकी संदर्भात माझी आणि त्यांची भेट झाली. त्यांनी संस्थात्मक निवडणुका लढवणार नसल्याचे सांगितले होते. त्यांनी निवडणूक प्रक्रियेत प्रत्यक्षात भाग घेतला नाही."
श्री. देशमुख म्हणाले,'कारखाना निवडणुकीत भाजपाच्या वरीष्ठ नेत्यांनी लक्ष घालण गरजेचे होते. हा एकट्याचा देशमुखाचा पराभव नसून तो भाजपाचाही आहे. वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घातले असते चित्र वेगळे दिसले असते.बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सोबत घेऊन निवडणूक लढवली मात्र सभापती निवड आणि कारखाना निवडणुकीत जिल्हयातील राष्ट्रवादीतील नेत्यांकडून देशमुख कुटुंबावर षडयंत्र रचले गेले.
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते