मुख्य सामग्रीवर वगळा

अक्षय भालेराव यांच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याची मागणी

आटपाडी ता.८-नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली गांवात अक्षय भालेराव या
बौद्ध तरुणाची गांव गुंडानी केलेल्या हत्येचा निषेध आटपाडीत नोंदवला. आटपाडीच्या तहसीलदार बी.एस. माने यांना निवेदन देऊन आरोपींना फाशी देण्याची मागणी निवेदनातून केली.
आटपाडी तालुक्यातील बौद्ध समाजाने विलास खरात यांच्या नेतृत्वाखाली  निवेदन तहसीलदार बी.एस. माने यांना दिले. यात राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मौजे बोंढार हवेली या गांवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करून गावातून मिरवणूक
काढली म्हणून अक्षय भालेराव तरुणांची निघृण हत्या केली आहे. तसेच
त्यांचे आई-वडील आणि भाऊ यांना मारहाण करून बौद्ध वस्तीवर दगडफेक केली. या घटनेचे समाजात तीव्र पडसाद उमटले आहेत. सदर घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. सदरचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा. तसेच अक्षय भालेराव यांच्या कुटुंबियांना संरक्षण देउन जास्तीत जास्त आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. यावेळी विलास खरात,यशवंत मोटे, आप्पा खरात, प्रभाकर खरात,पी.एस. खरात,सुभाष झोडगे,संतोष मोटे, नंदकुमार खरात, नामदेव 
वाघमारे, अशोक भांडग आदी उपस्थित होते.                  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते