आटपाडी - गेली चार वर्षे मान्सूनचा पाऊस वेळेवर होत असल्यामुळे खरिपाच्या पेरणीची शेतकऱ्यांनी जय्यत तयारी केली आहे. मात्र यंदा पाऊस झाला नसल्यामुळे खरिपाच्या पेरण्या थांबल्या आहेत. खरिपाच्या पेरणीसाठी बळीराजा पावसाकडे डोळे लावून बसला आहे. गेली चार वर्ष आटपाडी तालुक्यात मान्सून पाऊस बऱ्यापैकी कोसळत होता. दुष्काळी भागात गत चार वर्षे पावसाने सरासरी पेक्षा जास्त हजेरी लावली आहे. जोडीला टेंभू योजनेचे पाणी आल्यामुळे ओलीताखालील क्षेत्र वाढले आहे. वेळेवर येणारा पाऊस आणि टेंभूच्या पाण्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पिकाचा पॅटर्न बदलून शेतात नवनवीन प्रयोग सुरू केलेत. यंदा मात्र परिस्थिती गंभीर निर्माण झाली आहे. खरिपाच्या पेरणीसाठी बहुतांश शेतकऱ्यांनी शेतीची नांगरट, कुळवट यासारखी अंतर्गत मशागतीची कामे करून आणि खते घालून पेरणीसाठी शेतकरी सज्ज झाला आहे. याशिवाय उन्हाळी हंगामात दोन हजार एकर क्षेत्रावर कापूस आणि चार ते सहा हजार एकर क्षेत्रावर मका यासारखे पिकाची लागवड केलेली आहे. या पिकांनाही मोठ्या दमदार पावसाची आवश्यकता आहे. टेंभू योजनेच्या पाण्याने आटपाडी, बनपुरी,घाणंद, घरनिकी, निंबवडे, दिघंची आदी तलाव कमी अधिक क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे तलावा लगतच्या क्षेत्राला उपयोग झाला असून पिण्याच्या पाणी योजनांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या टँकरची अजून तरी प्रशासनाकडे मागणी झालेली नाही. अनेक गावात ओढ्याने पाणी सोडून ओड्यावरील बंधारे भरलेत. टेंभूच्या पाण्याच्या आधारावर दोन हजार हेक्टर क्षेत्रावरील डाळिंबाचा हंगाम शेतकऱ्यांनी धरला आहे. उन्हाळी हंगामात पेरणी केलेल्या पिकांना डाळिंब भागांना आणि खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांचे डोळे पावसाकडे लागलेत. उन्हाचा तडाका अजूनही कमी न झाल्यामुळे पेरलेल्या पिकाची पाण्याची गरज वाढली आहे. त्यात जास्त पाणी उपशामुळे पाणी पातळी खाली चालल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. उर्वरित डाळिंबाच्या बागाचा हंगाम धरण्याची तयारी शेतकऱ्यांनी पूर्ण केली आहे. डाळिंब बागेत अंतर्गत मशागत, छाटणी, शेण आणि वर खते घालून हंगाम करण्याची तयारी पूर्ण केली आहे मात्र पाऊस नसल्यामुळे बागांचा हंगाम अनेकांनी धरलेला नाही. पाऊस लांबल्याने शेतीची पेरणीची कामे पूर्ण थांबली आहेत. पाऊस लांबत केल्यास परिस्थिती गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा