आटपाडी ता.१७-ज्ञआटपाडी तालुक्यात सहा मिनी अंगणवाडी सेविकांची आणि बत्तीस मदतनीस अशी ३८ पदाची भरती प्रक्रिया एकात्मिक बाल विकास सेवा योजनेने सुरू केली आहे. सोमवार ता. 19 जून पासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. आटपाडी तालुक्यात 191 अंगणवाडीची संख्या आहे. यातील सहा मिनी अंगणवाडीतील अंगणवाडी सेविकांची पदे अनेक वर्षापासून रिक्त होती तसेच 32 अंगणवाडीमध्ये मदतनीसची पदे रिक्त होती. त्यामुळे सहा अंगणवाडीमध्ये पालक त्यांच्या विद्यार्थ्यांना पाठवत नव्हते तसेच मदतनीची पदे रिक्त असल्यामुळे तेथील अंगणवाडी सेविकावर कामाचा बोजा वाढला होता. ही पदे भरण्याची अनेक वर्षापासून मागणी होती. अखेर राज्य सरकारच्या आदेशाने एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाने रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सोमवार ता. 19 जून ते तीन जून या कालावधीत बालविकास प्रकल्प कार्यालयामध्ये अर्ज दाखल करण्याची मुदत जाहीर केली आहे. यासाठी किमान बारावी पास असण्याची अट घातली आहे. तसेच इतरही अटी आणि शर्ती लागू केल्या आहेत. यात दिघंची केंद्र क्रमांक 24, पुसावळवस्ती केंद्र क्रमांक 22, सातक मळा केंद्र क्रमांक सात, बेरगरवाडी क्रमांक 34, भोसलेवस्ती केंद्र क्रमांक 17 या ठिकाणी मिनी अंगणवाडी सेविकांची भरती केली जाणार आहे. तर शेटफळे येथील पाटीलमळा, रेबाई मळा, माळेवाडी, चिंचाळे येथील गायकवाडवस्ती, बनपुरी, निंबवडे क्रमांक 77 व 79, कोकरे वस्ती, जांभुळणी 187 व 52, पळसखेल, आवळाई, दिघंची येथील बुधावले वस्ती आणि केंद्र क्रमांक 30, यादववस्ती, करगणी येथील चांगभले वस्ती, गोमेवाडी येथील सिद्धनाथनगर, उंबरगाव मधील ठोंबरेवाडी, पिंपरी खुर्द येथील जाधववाडी, विभूतवाडी येथील हायस्कूलरोड,वलवन मधील जानकरवाडी, खरसुंडी, घरनिकी, नेलकरंजी, मेटकरवाडी, झरे, तडवळे, घाणद, कटारेवाडी, ढगेमळा, काळामळा या ठिकाणी असलेल्या अंगणवाडीतील रिक्त असलेली मदतनीसची पदे भरली जाणार आहेत.
करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा