मुख्य सामग्रीवर वगळा

आटपाडीतील "या" वास्तूची हेळसांड थांबवा अन्यथा,,,, आंदोलन उभारण्याचा "यांनी"दिला इशारा

आटपाडी ता.९- येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनकडे प्रशासनाने पुर्ण दुर्लक्षित केल्यामुळे अवकळा आली आहे. तातडीने त्याचे स्वच्छता, सुशोभीकरण आणि दुरुस्ती करावी, अन्यथा पंचायत समिती समोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा  ग्रामस्थांनी दिला आहे. तसे गटविकास अधिकारी मनोज भोसले यांना निवेदन दिले.  येथील  बचत भवनाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले आहे. त्याची मालकी पंचायत समितीची आहे मात्र वास्तूकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. या भव्य वास्तूची एकप्रकारे हेळसांडच सुरू आहे. बरेच दिवस रंगरंगोटी केलेली नाही. इमारतीचा रंग निघून गेला आहे. खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. आत मध्ये लाईट
व्यवस्था पूर्ण खराब झाल्याने बंद पडली आहे. भवन मध्ये आणि परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. आत आणि बाहेर मध्ये स्वच्छता नाही. साफसफाई केली जात नाही. त सदर बचत भवनची तातडीने दुरुस्ती, साफसफाई आणि रंगरंगोटी करावी,या मागणीचे निवेदन गटविकास अधिकारी मनोज भोसले यांना  दिले आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर बचत धामच्या इमारतीची दुरस्ती करून विवाह सोहळे,  समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, बैठका यासाठी नाममात्र भाडेतत्त्वावर देऊन भवन वापरात आणण्याची मागणी केली आहे. या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास पंचायत समिती समोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा  निवेदनकर्त्यांनी दिला आहे. यावेळी विलास खरात,आप्पा खरात,मोहन खरात,
बाबूराव मोटे, गजेंद्र चव्हाण, राजेंद्र सावंत, विकास खरात, रविंद्र लांडगे, शहाजी भिसे, दादा कदम,सोमेश खरात आदी उपस्थित होते.              

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते