मुख्य सामग्रीवर वगळा

शेटफळेच्या उपसरपंचपदी शिवसेनेचे ज्ञानेश्वर वाघमारे यांची निवड

शेटफळे ता. आटपाडीच्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिंदे गटाच्या शिवसेनेचे सदस्य ज्ञानेश्वर वाघमारे यांची एकमताने बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर ग्रामस्थांनी सत्कार करून कामासाठी शुभेच्छा दिल्या.                                                    शेटफळे ता. आटपाडी येथील ग्रामपंचायतीवर शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार अनिल बाबर आणि जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या गटाची सत्ता आहे. इतर सदस्यांना पदावर संधी देण्याच्या धोरणातून उपसरपंच विजय देवकर यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे नूतन उपसरपंच पदाची निवडणूक सरपंच शारदा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उपसरपंच पदासाठी सदस्य ज्ञानेश्वर वाघमारे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी लखन सनदी यांनी बिनविरोध निवड जाहीर केली. सूचक सदस्य सोमनाथ गायकवाड तर अनुमोदक सदस्य निवृत्ती गायकवाड होते. निवडीनंतर तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रा. सी. पी. गायकवाड यांच्या हस्ते उपसरपंचांचा सत्कार केला. यावेळी माणगंगा साखर कारखान्याचे संचालक किसनराव गायकवाड, सोमनाथ गायकवाड, विजय देवकर, महेंद्र भोरे, अमोल मंडले, वामनराव गायकवाड, नेताजी इंगवले, प्रा.समाधान गायकवाड, सत्यजीत मोकाशी, गुलाब गायकवाड, संजय गायकवाड, आकाश मोकाशी, रणजीत गायकवाड, सुनील गायकवाड रावसाहेब गायकवाड, सुखदेव गायकवाड, पत्रकार लक्ष्मण सरगर, पत्रकार तानाजी गायकवाड, स्वप्निल गायकवाड,  आदी उपस्थित होते.लक्ष्षमलक्ष्षमलक्ष्दी््ष्दी्ष्दी््ष््ष्दी््ष्दी्ष्द      

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते