मुख्य सामग्रीवर वगळा

शरद पवारांच्या समोर अजितदादा म्हणाले "मला मुक्त करा"

   मुंबई-विरोधी पक्षनेते अजित पवार हे रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आज मुंबईत झालेल्या मेळाव्यातही त्यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील नेत्यांना कानपिचक्या दिल्या. त्याचवेळी आता मला विरोधी पक्षनेतेपदावरून मुक्त करा,अशी मागणी केली आहे. मला या पदावरून मुक्त करून संघटनेत कोणतेही पद द्या आणि मग बघा पक्ष कसा चालतो अशा शब्दांत अजितदादांनी आपली इच्छा बोलून दाखवली आहे.
आज मुंबईत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त मेळावा पार पडला. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या मेळाव्यात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्याचवेळी पक्ष संघटनेच्या कामाबद्दलही परखड मते व्यक्त केली. पक्षातील नेत्यांना कानपिचक्या देत त्यांनी आपण स्वबळावर सत्ता का आणू शकलो नाही याचं आत्मचिंतन केलं पाहिजे असंही मत व्यक्त केलं.

मी गेली वर्षभर विरोधी पक्षनेते पदावर काम करतो आहे. मुळात मला यात कोणताही रस नव्हता. मात्र वरिष्ठांच्या सुचनेनंतर आपण हे पद घेतलं. काहीजण म्हणतात मी कडक बोलत नाही. आता काय त्यांच्या कॉलर पकडायच्या का..? असा सवाल करत अजित पवार म्हणाले, आता बास झालं या पदावरून मुक्त करा. मला संघटनेत कोणतेही पद द्या आणि मग बघा पक्ष कसा चालतोय. आजपर्यंत पक्षाने जी जबाबदारी दिली, ती मी यशस्वीपणे पार पाडली. त्यामुळे आता तुम्ही कसलंही पद द्या आणि मग बघा त्या पदाला कसा न्याय देतो या शब्दांत त्यांनी आपली इच्छा बोलून दाखवली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते