मुख्य सामग्रीवर वगळा

रक्तदान करण्यासाठी सांगलीतून एक हजार पोरं दिल्लीला घेऊन जाण्यासाठी 'यांनी' चक्क रेल्वेच बुक केली

कुस्तीचा आखाडा गाजवून सामाजिक कार्याच्या आखाड्यात उतरलेल्या पै. चंद्रहार पाटील 12 ऑगस्टला दिल्लीला एक हजार पोरं रक्तदानासाठी घेऊन जाणार आहे त्यासाठी त्याने चक्क पूर्ण एक रेल्वेज बुक केली आहे. सांगली  जिल्हा हिऱ्यांची खान असणारा जिल्हा आहे. अस जुनी जाणती माणस म्हणायची. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिसिंहनाना पाटील, यांच्यापासून ते वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, जी.डी.बापू लाड, आर. आर. पाटील, डॉ. पतंगराव कदम, पैलवान मारुती माने अशी सुरू झालेली परंपरा आजही कायम आहे. जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असणारे तरुण कमी नाहीत.  समृद्ध वारसा युवकांनी जपल पाहिजे. त्याच ध्येयाने प्रेरित होऊन डबल महाराष्ट्र केसरी विजेता मल्ल चंद्रहार पाटील धडाडीने सामाजिक कार्यात काम करू लागला आहे. जिल्ह्याचे नाव वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवावं हाच संकल्प आणि जिद्द घेऊन दंड थोपटून हा मातीतला पुत्र बाहेर पडला आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये दोन वेळा बहुमान मिळवून जिल्ह्याचे नाव राज्यभर केले. कुस्तीच्या आखाड्यातून बाहेर पडल्यानंतर त्यानी नवीन पैलवान घडवण्यासाठी राज्यातील सर्वात मोठी तालीम उभारण्याचे काम हातात घेतल आहे. जवळपास ते अंतिम टप्प्यात आले आहे. नुकतीच या मातीतल्या मल्लांने राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धा घेऊन पुन्हा एकदा राज्याची लक्ष वेधले. कुस्ती आखाड्यानंतर तेवढ्याच नेताना आणि तयारीने चंद्रहार पाटील सामाजिक कार्याच्या आखाड्यात उतरले आहेत. भारत देशाच्या जवानांना एक लाख बाटल्या रक्ताचे संकलन करून देशाच्या सैनिक हॉस्पिटलला दिल्लीला पाठवण्याचा निर्धार जाहीर केला आहे. त्या दृष्टीने पलूस कडेगाव तालुक्यात प्रत्येक गावागावात जाऊन तळ ठोकून रक्तदान शिबिरे घेतली आहेत. ही मोहीम संबंध जिल्हाभर चालणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात चंद्रहार पाटील स्वतः आपल्या टीम सोबत जाऊन एक लाख रक्त बाटल्याचे संकलन करणार आहेत. त्याचे त्यांनी अत्यंत सूक्ष्म असे नियोजन केले असो प्रत्यक्षात काम ही वेगात सुरू केले आहे.                      15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील एक हजार तरुणांना रेल्वेने दिल्लीला घेऊन जाणार असून तेथील भारतीय आर्मी हॉस्पिटलमध्ये जाऊन रक्तदान करणार आहेत. त्यासाठी एक हजार तरुणांनी त्यांच्याकडे नाव नोंदणी केली असून या तरुणांच्यासाठी चक्क एक रेल्वेच पूर्ण बुक केली आहे. 12 ऑगस्ट ला चंद्रहार पाटील 1000 तरुणांना सोबत घेऊन मिरजेतून रेल्वेने दिल्लीला जाणार आहेत. तिथे स्वातंत्र्यदिना दिवशी 15 ऑगस्टला रक्तदान शिबिर होईल. त्यानंतर ते परत येणार आहेत. चंद्रहार पाटील यांच्या या महा रक्तदान शिबिराच्या अभियानामुळे सध्या ते जिल्हाभर लोकांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते