आटपाडी-- आटपाडी महसूल विभागातील तहसीलदार पदाच्या खुर्चीसाठी बदली झालेल्या तहसीलदार बी. एस. माने यांनी अवघ्या चार दिवसांमध्ये मॅटमध्ये (न्यायधिकार) जाऊन स्थगिती मिळवली. आटपाडी महसूल विभागाच्या इतिहासातील हा पहिलाच प्रकार असून महसूल आयुक्तांच्या बदली आदेशाविरोधात स्थगिती मिळवली आहे. या साऱ्या बदलीच्या प्रकरणाची लोकात मात्र रंगतदार आणि कुमार चर्चा रंगली आहे. आटपाडीच्या तहसीलदार बी. एस. माने यांच्या बदलीचा आदेश 15 जून रोजी महसूल आयुक्तांनी काढला होता. त्यांच्या जागी सचिन मुळी यांच्या नियुक्तीचाही आदेश काढला होता. तहसीलदार माने यांची आटपाडीत बदली होऊन 25 महिने झाली होती. कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याची तीन वर्षे बदली करता येत नाही. जर बदली केली असेल तर त्या विरोधात मॅटमध्ये दात मागीतली जाते. आटपाडी मध्ये महसूल, पोलीस प्रशासन आणि पंचायत समितीच्या शासकीय कार्यालयात अनेक अधिकाऱ्यांच्या तीन वर्षाच्या आत मध्ये बदल्या झालेल्या आहेत. मात्र यावेळी पहिल्यांदाच तहसीलदार बी.एस. माने यांनी मॅटमध्ये धाव घेऊन अवघ्या चार दिवसात बदलीला स्थगिती मिळवली आहे. एखादा अधिकारी अन्याय झाल्याच्या भावनेतून मॅटमध्ये जाऊन पुन्हा तीच खुर्ची मिळवण्याचा आटपाडी महसूल मध्ये हा पहिलाच प्रकार घडला आहे. महसूल आयुक्ताच्या आदेशाविरोधात त्यांनी दाद मागून बदलीला स्थगिती मिळवली आहे. त्यामुळे नवीन आलेले तहसीलदार सचिन मुळीक यांनी कालच स्वीकारलेला पदभार सोडून मुंबईला धाव घेतली आहे तर बदलीला स्थगिती मिळवून आलेल्या तहसीलदार बी.एस.माने यांनी आज पुन्हा पदभार स्वीकारला. या साऱ्या घडामोडीची लोकांच्यात रंगतदार चर्चा रंगली आहे.
करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा