मुख्य सामग्रीवर वगळा

भाजप विरोधकां ठरल,,,, काय ते वाचा

दिल्ली -- आगामी लोकसभा निवडणूकाचया पार्श्वभूमीवर काही महिन्यांपासून देशातील विरोधी पक्षांनी एकत्र येण्यासाठी मोट बांधली आहे. बिहारचे मुख्यमंत्री तथा जेडीयू पक्षाचे सर्वेसर्वा नितीश कुमार यांच्यावर ही जबाबदारी दिली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी देशातील सर्व महत्त्वाच्या विरोधी पक्षांची येत्या १२ जून रोजी बैठक होणार होती. मात्र आता ही बैठक येत्या २३ जून रोजी होणार आहे. विशेष म्हणजे या बैठकीला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचे नेते राहुल गांधी हेदेखील उपस्थित राहणार आहेत. देशातील विरोधी पक्षांचे सर्वोच्च नेते या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे नितीश कुमार यांनी सांगितले आहे.
याआधी विरोधकांची बैठक १२ जून रोजी पार पडणार होती. मात्र या बैठकीत राहुल गांधी तसेच खरगे उपस्थित राहू शकणार नाहीत, असे काँग्रेसने कळवले होते. याच कारणामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही बैठक २३ जून रोजी होणार आहे. या बैठकीसाठी आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री तथा डीएमके पक्षाचे नेते एमके स्टॅलिन असे देशातील महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. आगामी २०२४ च्या लोकसभा निडणुकीवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेली विरोधकांची ही पहिलीच बैठक आहे. त्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पटणा येथे ही बैठक पार पडेल.
राहुल गांधींसह इतर प्रमुख नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
व “काही विरोधी पक्षांच्या नेत्यांनी १२ जून रोजीच्या बैठकीला उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शवली होती. त्यामुळे ही बैठक आम्ही पुढे ढकलली होती. आता  सर्वच प्रमुख पक्षांनी बैठकीला उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले आहे,” असे राजीव रंजन सिंह म्हणाले आहेत. सिंह यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या बैठकीला राहुल गांधी, ममता बॅनर्जी, मल्लिकार्जुन खरगे, एमके स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार, आप पक्षाचे प्रमुख तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, सीपीआय पक्षाचे नेते डी राजा, सीपीएम पक्षाचे नेते सिताराम येच्यूरी, सीपीआय-एमएल पक्षाचे नेते दीपांकर भट्टाचार्य आदी नेते उपस्थित राहणार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते