आटपाडी - मुंबई येथे माथाडी मध्ये नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून तरूणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी लेंगरेवाडी येथील दादासाहेब जानकर यांच्या विरोधात आटपाडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी आणि फसवणूक झालेल्या तरुणांनी अधिक माहिती दिली. आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांनीही या गंभीर प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपीवर कडक कारवाई करून तरुणांना न्याय देण्याची मागणी केली आहे. जांभुळणी येथील पोपट घुटुकडे, बाजीराव घुटुकडे आणि बनपुरी येथील दिगंबर यमगर या तिघा तरुणांनी नोकरीचे आमिष दाखवून दादासाहेब जानकर यांनी साडेसहा लाखाची फसवणूक केल्याची तक्रार आटपाडी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. गेल्या वर्षी दादासाहेब जानकर त्यांच्या संपर्कात आला होता. तो मुंबईत वास्तव्य करतो. त्याचे मूळ गाव लेंगरेवाडी ता. आटपाडी आहे. मुंबईत एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे सांगून अनेक नेतेमंडळीशी जवळचा संबंध आहे. त्यामुळे तुम्हाला माथाडी मध्ये नोकरी लावतो असे या तरुणांना आमिष दाखवले होते. त्यासाठी अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतात असे सांगून या तीन तरुणांकडून लाखो रुपये घेतले होते. यातील एकाने मुंबईत वडीलाची असलेली छोटी खोली विकून पैसे दिले. तर इतर दोघांनी नातेवाईक आणि मित्राकडून पैसे घेऊन दिले होते. गेली वर्षभरापासून हे तरुण नोकरीसाठी त्याच्या मागे लागले होते. जानकराने त्यांना खेळवत ठेवले. आठ ते दहा महिन्यानंतर या तरुणांच्या आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी जाणकाराकडे दिलेले पैसे परत देण्याची मागणी केली. ते पैसेही देण्यात जानकाराकडून टाळाटाळ केली जात होती. तरुणांनी या संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितल्यानंतर एकाला 50 आणि दुसऱ्याला 80 हजार रुपये दिले. उर्वरित साडेसहा लाख रुपये त्याच्याकडून येणे होते. या पैशासाठी तरुणांनी त्याच्यामागे तगादा लावला मात्र त्याने पैसे देणार नाही असे सांगितल्याने अखेर आटपाडी पोलीस ठाण्यात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली.
करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा