मुख्य सामग्रीवर वगळा

आटपाडी बाजार समितीच्या डाळिंब लिलावात "या"साठी केले क्रेट मागे दहा रुपये कमी

आटपाडी - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब सौदे बाजारात आडतदाराची व्यापाऱ्याकडून प्रत्येक क्रेटमागे दहा रुपयाची चुकीची आकारणी अनेक वर्षापासून सुरू होती. नूतन सभापती संतोष पुजारी यांनी व्यापारी आणि आडतदारांची बैठक घेऊन क्रेट मागे दहा रुपयाची चुकीची आकारणी कायमची रद्द करण्याचा निर्णय घेतला.                                                  येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेली पंधरा वर्षे डाळिंबाचा सौदे बाजार भरतो. पहिले काही वर्षे आठवड्यातून तीन दिवस लिलाव होत होता. त्यानंतर शनिवार वगळता आठवड्यातील सर्व दिवस बाजार सुरू केला. त्याचा चांगला परिणाम झाला. आडतदार शेतकऱ्याकडून अनेक आकारणी करत होते. त्याला शेतकऱ्यातून तीव्र विरोध झाल्यानंतर ती आकारणी बंद करून शेतकऱ्याकडून फक्त हमाली आणि तोलाई रक्कम घेण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला होता. त्याची अंमलबजावणीही सुरू होती.                         बाजार समितीत डाळिंबाचे सौदे झाल्यानंतर व्यापाऱ्याने खरेदी केलेल्या डाळिंबाचे क्रेट व्यापाऱ्यांच्या नावाने वेगवेगळ्या बाजूला आडतदार लावत होते. हे क्रेट उचलून दुसरीकडे न्यावे लागत होते. त्यासाठी आडतदार व्यापाऱ्याकडून दहा रुपये आकारणी करत होते. अनेक वेळा डॅमेज माल भरपूर आल्याने मालाच्या किमतीच्या 25% रक्कम व्यापाऱ्यांना हमालीसाठी द्यावी लागत होती. खराब मालासाठी क्रेट मागे दहा रुपयाची आकारणी व्यापाऱ्यांना आर्थिक दृष्ट्या परवडत नव्हती. व्यापाऱ्यांनी याचे गारहाने नूतन सभापती संतोष पुजारी यांच्याकडे नूतन संचालक सुबराव पाटील आणि संचालक सुनील तळे यांच्या माध्यमातून घातले. सभापती संतोष पुजारी यांनी तात्काळ व्यापारी आणि आडतदारांची सभागृहात बैठक घेतली. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर ही आकारणी कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला. त्याला व्यापारी आणि आडतदारानी सहमती देऊन पाठिंबा दिला. या निर्णयाचे व्यापाऱ्याने विशेष कौतुक केले.        

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते