मुख्य सामग्रीवर वगळा

शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, पंजाबराव डंख यांनी सांगितली पावसाची तारीख,,

पुणे-- मान्सून बाबतची शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी पुढे आलेली आहे, हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी मान्सून 25 जून ते 15 जुलै पर्यंत चा अंदाज वर्तवलेला आहे. महाराष्ट्र मध्ये मान्सून कधी दाखल होणार याची प्रतीक्षा शेतकरी करत आहे. हवामान खात्याअंतर्गत मान्सूनचे आगमन महाराष्ट्रामध्ये 11 जूनला झाले असे घोषित करण्यात आलेली होते, परंतु त्यानंतर महाराष्ट्र मध्ये मान्सून ने पलटी मारली. व त्यामुळे शेतकऱ्यांना चिंता लागलेली होती की मान्सून केव्हा येणार.
मान्सून महाराष्ट्रात न आल्याने ज्या शेतकऱ्यांनी शेतामध्ये पिकांची पेरणी केलेली आहे असे शेतकऱ्यांना मात्र खूप काळजी लागून राहिलेली होती, परंतु हवामान अभ्यासक पंजाबराव डखं यांनी 25 जून ते १५ जुलै पर्यंत मान्सूनचा अंदाज वर्तवलेला आहे.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र मध्ये मान्सून येणार असे अंदाज वर्तवण्यात येत होती परंतु मान्सून मुख्य कारण म्हणजे मधेच आलेले चक्रीवादळ आहे. चक्रीवादळ आल्यामुळे मान्सून सक्रिय होण्यास अडचणी निर्माण झाल्या. व अशा परिस्थितीमध्ये मान्सून दाखल होण्यास वेळ लागत आहे.
*या तारखे दरम्यान महाराष्ट्रात जोरदार पाऊस*
हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी मान्सून बाबतची स्थिती वर्तवलेली आहे, त्यांच्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये 25 जून पासून ते 15 जुलै पर्यंत जोरदार पाऊस होणार आहे. त्याचबरोबर हा पाऊस दररोज वेगवेगळे भाग बदलून पडणार आहे. त्याचप्रमाणे 27 ते 28 तारखे दरम्यान संपूर्ण महाराष्ट्राचा काही भाग मान्सूनने व्यापला जाणार आहे.
*या तारखे दरम्यान शेतकऱ्यांच्या पेरण्या होतील*
25 जून पासून ते 1 जुलै पर्यंत महाराष्ट्राचा बराचसा भाग म्हणजे व्यापला जाईल, त्याचबरोबर या तारखेनदरम्यान अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण होतील असा अंदाज वर्तवलेला असून, एक जुलै पर्यंत ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या झालेल्या नसेल अशा शेतकऱ्यांच्या प्रेरणा मात्र 1 ते 10जुलै पर्यंत पूर्ण होतील. असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते