मुख्य सामग्रीवर वगळा

"रडायचं नाही, आत्ता लढायचं", देशमुखाच्या कार्यकर्त्यांचा मेळाव्यात निर्धार

आटपाडी -जिल्हा बँक, बाजार समिती आणि कारखाना या दोन-तीन निवडणुकीत अपयश आले म्हणून खचून जायच नाही आणि चुळबुळही करायची नाही. भाजप पक्षासोबतच निष्ठेने राहुन पुन्हा नेटाने उभा राहून लढून गतवैभव मिळवण्यचा  निर्धार देशमुख गटाच्या कार्यकर्त्यांनी मेळाव्यात आज केला.                                                भाजपचे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख आणि भाजप विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख अमरसिंह देशमुख यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. निवडणुकीतील जिल्हा बँक आणि बाजार समितीच्या निवडणुकीतील पराभव, कार्यकर्त्यांत आलेली मरगळ आणि त्यांच्या भावना लक्षात घेण्याच्या दृष्टीने मेळाव्याचे आयोजन केले होते. श्रीमंत बाबासाहेब देशमुख सूतगिरणीवर मेळावा पार पडला. तालुक्यातून देशमुख गटाचे ज्येष्ठ नेते मंडळी पासून तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा पार पडली. बैठकीला माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, माजी सभापती नारायण चवरे, श्रीरंग कदम,माजी सभापती विद्याताई देशपांडे, सुमनताई नागणे, माजी उपसभापती बळीअण्णा मोरे, माजी सभापती हरिभाऊ माने, देशमुख बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, माजी सभापती भाऊसाहेब गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जनार्दन झिंबल प्रमुख उपस्थित होते. बैठकीत प्रा. अंकुश कोळेकर, संभाजी देशमुख, सावंता पुसावळे, विजय देशपांडे, राजू विभुते, आर. बी. गायकवाड, प्रमोद भोसले, महिपत पवार, विठ्ठल पुकळे आदी कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यात निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावले जात असल्याची भावना काही तरुणांनी व्यक्त केली तसेच प्रमुख नेते मंडळींनी कार्यकर्त्यासह लोकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याची सूचना वजा विनंती केली तसेच प्रतिस्पर्धी विरोधक काय करतो, लोकांना किती वेळ देतो, लोकांच्या सुखदुःखात किती सहभागी होतो त्याचे अनुकरण करण्याची विनंती केली. तसेच अनेक गटात त्या त्या लोकांना पुन्हा पुन्हा संधी देण्याऐवजी नवीन तरुणांना ही संधी देण्याची सूचना मांडली. कार्यकर्त्यांना वेळ आणि बळ द्या. अंतर्गत गटबाजी संपवा. फितुरांना जवळ घेऊ नका अशा भावना कार्यकर्त्यांनी मांडल्या. मेळाव्यात कार्यकर्त्यांनी दबाव न घेता आपल्या भावनांना आज वाट करून दिली. त्यानंतर माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी पक्षाने आपल्यावर विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख म्हणून काम करण्याची संधी आणि जबाबदारी दिली आहे. ती आपण सक्षमपणे पेलून आणि नेटाने काम करून दाखवून देऊ. जिल्हा बँक, बाजार समिती आणि कारखाना निवडणुकीत आपले काही निर्णय चुकल्याने कबुल करत प्रत्येक बूट टू बूट पक्ष सक्षम बनवू. कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून कामाला लागण्याचे अहवान केले. कार्यकर्त्यांच्या मागे 24 तास मोठ्या ताकतीने उभा राहण्याची ग्वाही त्यांनी दिली. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचीच लाट असून पक्ष मोठा आहे. अजून तालुक्यापासून दिल्लीपर्यंत बऱ्याच घडामोडी घडणार आहेत.  कसल्याही पदाची अपेक्षा न ठेवता नेटाने पक्षी बांधणी करून दाखवण्याचे अहवान कार्यकर्त्यांना केले. तसेच यापुढे देशमुख गटाचे सर्व निर्णय अमरसिंह देशमुख घेतील असे राजेंद्रअण्णा देशमुख यांनी जाहीर केले. यावेळी अमोल काटकर, राजेवाडीचे सरपंच प्रशांत शिरकांडे, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रणव गुरव, शहाजी यादव, दत्तात्रय कांबळे, महादेव पाटील आदी उपस्थित होते.                                     - माणगंगा साखर कारखान्या संदर्भात आमदार अनिल बाबर आपल्यासोबत सकारात्मक होते. त्यांनी जिल्हा बँके आणि बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांनी विरोधकांना सहकार्य केले होते. कारखान्याबाबत त्यांनी दोन वेळा बैठक घेऊन तडजोडीसाठी प्रयत्न केले. एवढेच नव्हे तर कारखान्याच्या निवडणूक प्रचारात आपल्या सोबत येणार असल्याचा शब्द दिला होता, असे गुपीत अमरसिंह देशमुख यांनी सांगितले.                                   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते