मुख्य सामग्रीवर वगळा

आवडीचे आणि कौशल्याचे क्षेत्र करियर म्हणून निवडावे

शेटफळे--- विद्यार्थ्यांनी स्वतःची आवड, कौशल्य आणि प्राविण्य लक्षात घेऊन तेच क्षेत्र करियरसाठी निवडावे असे प्रतिपादन सेंटर फॉर करिअर कौन्सलिंग बारामतीच्या अध्यक्षा अँड. सारिका पाटील यांनी केले.    शेटफळे तालुका आटपाडी येथे ध्येय दिशा संस्कार पेरणी प्रतिष्ठानने विद्यार्थ्यांच्यासाठी करिअरची निवड या विषयावर सारिका पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते यावेळी त्या बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शारदा गायकवाड होत्या. यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा संभाजी गायकवाड, अध्यक्ष सुनील गायकवाड, डॉ. अंजली कदम, डॉ. नारायण कदम, पतंगराव गायकवाड प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिष्ठानच्या कविता गायनाने झाली. त्यानंतर दहावी, बारावी आणि सीईटी मध्ये विशेष गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. अँड. पाटील यांनी शालेय विद्यार्थ्यांना अत्यंत सोप्या भाषेत त्यांच्याशी सुसंवाद ठेवत करिअरची निवड या विषयावर मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या,"विद्यार्थ्यांनी दहावीपर्यंत फक्त शिक्षणावरच लक्ष केंद्रित करावे. त्यावेळी कोणत्या क्षेत्रात निवडावा त्याचा जराही विचार करू नये. खरा तर अकरावीनंतरच अभ्यासाचा जोर वाढवावा. त्यावेळी आपली आवड कौशल्य प्राविण्य अशा सर्व गोष्टी विचारात घेऊन करिअरची निवड करावी. इतरांचे अनुकरण न करता किंवा स्पर्धा न करता क्षेत्र निवडावे. सोशल मीडियापासून विद्यार्थ्यांनी शालेय अवस्थेत लांब राहावे. तुमचा वेळ तुम्हाला घडवण्यासाठी खर्च करावा. जिथेही जावा तिथे फक्त शिकत राहावा. कष्ट आणि सातत्य ठेवले तर तुम्ही करिअर म्हणून निवडलेल्या आवडीच्या क्षेत्रात उच्च स्थानावर पोहोचता, असे मत व्यक्त केले. यावेळी युवराज गायकवाड,पतंगराव गायकवाड, वामनराव गायकवाड, विजय गायकवाड, हणमंत गायकवाड, संजय गायकवाड, अर्जुन गायकवाड, शशिकांत गायकवाड आदी उपस्थित होते. सुनील गायकवाड यांनी प्रास्ताविक केले तर तनिष्का गायकवाड हिने सूत्रसंचालन केले. गौरीहर पवार यांनी आभार मानले.             

टिप्पण्या