मुख्य सामग्रीवर वगळा

"यांना" पंतप्रधान तर "यांना" मुख्यमंत्री करण्यासाठी कार्यकर्त्यांनी समर्पित भावनेने झोकून द्यावे सादीक खाटीक

आटपाडी ता.९- देशातील बहुतांश राजकीय पक्षात आदरस्थानी असणारे खासदार शरदचंद पवार देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील राज्याचे मुख्यमंत्री होण्यासाठी करोडो कार्यकर्त्यानी यापुढच्या काळात समर्पित भावनेने काम करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक यांनी केले आहे.
        राष्ट्रवादीचा १० जुनला २४ वा वर्धापन दिन आणि याच दिवसापासून सुरु होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या प्रारंभाचे औचित्य साधून सादिक खाटीक बोलत होते.  सादिक खाटीक पुढे म्हणाले, २०२४ च्या निवडणूकीत देशात आणि राज्यात दोन तृतियांश बहुमताने भाजप विरोधकांचे सरकार सत्तेवर येणार असून सर्वात अनुभवी शरद पवार  यांच्यावर पंतप्रधान पदाची जबाबदारी येवू शकते. महाविकास आघाडी राज्यात लोकसभेच्या सर्वच्या ४८ जागा आणि विधानसभेच्या २४० पर्यत जागा जिंकणार असल्याने देशात राष्ट्रवादीचे पंतप्रधान आणि जयंतराव पाटील राज्यात मुख्यमंत्री, असा दुहेरी दुग्धशर्करा योग वास्तवात येण्याची वेळ जवळ आली आहे. गुजरात्यांच्या दावणीला महाराष्ट्र बांधण्यापेक्षा दिल्लीच्या तक्तावर मराठी माणूस बसला पाहीजे, अशा भावनेची प्रचंड लाट महाराष्ट्रात निर्माण झाली आहे.राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने यापुढच्या काळात झोकून देवून , समर्पित भावनेने राष्ट्रवादीचा जागर केला पाहीजे. राष्ट्रवादीसाठीच ही भावना कोट्यावधीच्या अंतकरणात तेवत ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा. देशातील सर्वसामान्य जनता, महागाई, बेरोजगारी, आणि विषमतेने त्रस्त आहे . मध्यमवर्गीय असुरक्षित आहेत . कष्टकरी हवालदिल आहेत . कामगार, शेतकरी, खेळाडूंची आंदोलने दडपली जाताहेत . विविध तपास यंत्रणाचा वापर करून विरोधकांना नामोहरम केले जात आहे . त्यांना तुरंगात डांबणे , त्यांची खासदारकी रद्द करणे असे प्रकार घडत आहेत . दैनंदिन गरजेच्या प्रत्येक गोष्टीवर वाढीव कर आकारणी आणि प्रचंड महागाईने सर्वसामान्यांना मोडून काढले जात आहे .
                शिक्षण, आरोग्य या वरील अनुदानात, रोजगार हमी योजना, अन्न सुरक्षा योजनांच्या निधीतही मोठी कपात करून सर्वसामान्यांचे जगणे वेठीस धरले जात आहे . सार्वजनिक उद्योग, सरकारी शस्त्रास्त्र निर्मिती कारखाने, खाणी, विमानतळे, बंदरे सार्वजनिक वाहतूक, वीजनिर्मिती केंद्रे, कार्पोरेट कंपन्यांना विकुन टाकण्याचे धोरण वेग धरत आहे . खाजगीकरणात आरक्षण व सामाजीक न्याय ही वेठीस धरला जात आहे . शेतकऱ्यांच्या हिताविरोधी धोरणे स्विकारली जात आहेत . कामगार, कर्मचाऱ्यांच्या समस्यां बाबत अनास्था दाखविली जात आहे . बेरोजगारीने कळस गाठला असून युवकांचे भवितव्य अंधकारमय बनविले जात आहे . गुणवत्तापुर्ण आणि दर्जेदार नागरी सुविधांपासून नागरीकांना वंचित ठेवले जात आहे. अशा शेकडो बाबींमधील होत चाललेली हेळसांड, उपेक्षा यामुळे देशातील जनता भयानक त्रस्त आहे . धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरणातून राष्ट्रीय एकात्मता, शांतता , बंधुता, सदभावना, आपसातला भाईचारा संपुष्टात आणण्याच्या प्रकारांकडे सोयीस्कर पणे डोळेझाक केली जात आहे . अशा शेकडो गोष्टींनी संतापलेली जनता यावेळी देशात प्रचंड परिवर्तनाच्या बाजूने आहे .त्याचा प्रत्यय कर्नाटकात अकेला लढलेल्या कॉंग्रेसला मिळालेल्या प्रचंड जनाधारातून नुकताच आला आहे . आणि देशात भाजपा विरोधी अनेक पक्ष एकदिलाने, एकवटून लढणार असल्याने प्रचंड बहुमताने भाजपाला देशातली सत्ता गमवावी लागणार आहे . महाराष्ट्रात ही तीन मुख्य पक्ष्यांची महाविकास आघाडी, दोन तृतियांशच्या वर जागा जिंकत सत्तेवर येणार आहे . असा आशावाद ही सादिक खाटीक यांनी बोलुन दाखविला .
                राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आटपाडी तालुक्यातील व्यक्तीला आमदार करावे . आज अखेर झालेल्या विधानसभेच्या १५ निवडणूका मध्ये कवठेमहंकाळ - आटपाडी विधानसभा मतदारसंघातील दोन निवडणुकांचा अपवाद वगळता खानापूर - आटपाडी मतदार संघातून लढल्या गेलेल्या उर्वरीत १३ निवडणुकांमध्ये १२ वेळा खानापूर तालुकावाशीय आमदार झाले . बंडखोरी करून मिळविलेली आमदारकी १३ निवडणुकीतील आटपाडी तालुक्याची एकमेव कमाई होती . ही अन्यायी विसंगती दुर करीत २०२४ च्या विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आटपाडी तालुक्यातील कोणत्याही व्यक्तीला उमेदवारी द्यावी. माजी उपपंतप्रधान कै . यशवंतराव चव्हाण यांच्या दुरदृष्टीतून आटपाडी तालुकावाशीय महाराष्ट्र वाल्मीकी, महाकवी ग. दि . माडगूळकर आण्णा दोन वेळा विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्त केले गेले होते, आणि जिल्ह्यातून धनगर समाजाला उमेदवारी द्यायच्या तत्कालीन कॉंग्रेस धुरीणांच्या भूमिकेतून कवठेमहांकाळ - आटपाडी या मतदार संघातून आटपाडीकर आण्णासाहेब लेंगरे आमदार होवू शकले . हे सन्माननीय अपवाद वगळता खानापूर तालुक्याच्या पदरातच नेहमी आमदारकी बहाल केली गेली आहे . यावेळी आटपाडी तालुका वाशीयाला विधानसभेची उमेदवारी द्यावी अथवा विधानसभा निवडणूकी पूर्वी आटपाडी तालुका वाशीयाला विधान परिषदेवर आमदार करावे, तसेच पक्ष संघटनेच्या पातळीवर आटपाडी तालुक्याला झुकते माप देताना, *एक दोन जिल्हास्तरीय सेलची प्रमुख पदे, विधानसभा मतदार संघ पातळीवर युवकांचे, महिलांचे आणि वरिष्ठांचे अध्यक्ष पद आटपाडी तालुक्यातील कार्यकर्त्यांना द्यावे, अशा भावनाही सादिक खाटीक यांनी व्यक्त केल्या .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते