मुख्य सामग्रीवर वगळा

नाथपंथी अखिल भारतीय महासंघाकडून गुणवंतांचा सन्मान

बीड प्रतिनिधी- अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ बीड आणि नाथमुद्रा बचत गट बीड यांच्या संयुक्त विद्यमाने वर्ग 10 वी आणि वर्ग 12 वीच्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. के .बी. पैठणकर तर प्रमुख पाहुणे शॉर्ट फिल्म अभिनेता संतोष गोरे आणि निर्माता ॲड.विजय जावळे यांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात नवनाथांच्या प्रतिमेला  पुष्पहार घालून  करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे निमंत्रित मान्यवर यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले नंतर बीड जिल्हा अध्यक्ष श्री भरत चव्हाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. नंतर गुणवंत विद्यार्थी चैतन्य शिराळकर ,गणेश मधुरकर, कुमारी वैष्णवी भराडी. कुमारी प्रणाली शेळके .कुमारी वैष्णवी जाधव .अनिकेत जाधव .योगेश जाधव आणि कुमारी योगिता सूर्यवंशी यांचा मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .नंतर मान्यवरांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन  करण्यात आले. सर्वप्रथम माजी मुख्याध्यापक श्री संजय सावंत सर यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात समाजात  टिकायचे असेल तर अभ्यास करून नावलौकिक करा .   आई-वडिलांचे नाव उज्वल करा हे सांगितले तर प्रा.यादव सर यांनीही विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले तसेच शॉर्ट फिल्म अभिनेता संतोषजी गोरे यांनी विद्यार्थ्यांना दहावीच्या पुढे आणि बारावीच्या पुढे कोण कोणत्या अभ्यासक्रमाला गेले पाहिजे हे सांगून आपले करिअर घडवत असताना जिद्द ,चिकाटी व मेहनत घेतली पाहिजे असे सांगितले .नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर के बी पैठणकर यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना स्वतःच्या उदाहरणातून मी करिअर कसे घडवले व या स्तरावर येऊन पोहोचलो हे सांगून विद्यार्थांनी हिम्मत व धैर्य वाढविले पाहिजे तरच जगात टिकले जाल तसेच परिश्रम घेतल्याशिवाय कोणतीच गोष्ट शक्य होत नाही हे आवर्जून सांगितले . या कार्यक्रमासाठी महासंघाचे पदाधिकारी  मराठवाडा युवा अध्यक्ष डॉ.एस के.सुरवसे,रंगनाथ पैठणकर हरिभाऊ भराडी  गणेश  शिंदे दत्ता शिराळकर   नाथमुद्रा बचत गटाचे सर्व सदस्य  जिल्ह्यातून बहुसंख्य नाथ बांधव विद्यार्थ्यांचे पालक श्री मच्छिंद्र शेळकेश्री लिंबराज मधुरकर श्री नवनाथ भराडी श्री बापू जाधव श्री अशोक जाधवश्री गजेंद्रकुमार यादव हे उपस्थित होते..या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनश्री भैरवनाथ शिंदे सर यांनी तर आभार प्रदर्शन गणेश शिंदे यांनी केले .नाश्ता आणि चहापानानंतर सांगता करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते