सांगली-अखंड सांगली जिल्हा एकाच दिवसात दोन झालेल्या खुनामुळे पूर्ण हादरून गेला आहे. गेल्या महिन्याभरापासून खून, खुनी हल्ला, जबरी चोरी आणि दरोड्याची मालिका काही केल्या थांबता थांबेना. त्यातच काल मिरज तालुक्यात कसबे डिग्रज येथे भाजी विक्रेत्याचा आणि बेडग येथे चुलत भावाचा खून केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. गेल्या महिन्याभरापासून सांगली जिल्ह्यात खुनाच्या मालिकाचे सत्र सुरू झाले आहे. जत, मिरज आणि सांगली शहरात हे खुनाचे सत्र सुरू आहे. पूर्ववैमानस्य आणि इतर वैयक्तिक किरकोळ कारणातून या खुनाच्या घटना घडल्या आहेत. बहुतांश खुनात तरुण पोरच सहभागी आहेत. या घटनेने जिल्ह्यातील नागरिकासह पोलीस प्रशासनही हादरून गेले आहे. चार दिवसापूर्वी सांगलीत एका गुंडाचा अवघ्या 20 ते 22 वर्षाच्या पोरांनी गोळ्या झाडून खून केल्याची घटना ताजी असताना मिरज तालुक्यात कसबे डिग्रज आणि बेडग मध्ये दोन खून झाल्याने खुनाची मालिका सुरूच राहिली आहे. बेडग येथे बेडग ते मल्लेवाडी रस्त्यालगत शेळके वस्तीवर पूर्व वैमन्यातून चुलत भावाने भावाचा खून केला आहे. खुनानंतर हा संशयित कुराडीसह मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. यामध्ये रामचंद्र शंकर खरात रा. बेडग हा मृत्युमुखी पडला आहे. त्याच्या सख्ख्या चुलत भावानेच कुराडीने वार करून खून केला आहे. त्यांच्यात पूर्वीपासून वाद होता. या वादाचे पर्यावरण हाणामारी झाली आणि त्यानंतर खून झाला तर कसबे डिग्रज येथे एका भाजी विक्रेत्याचा चाकूने भोसकून खून करण्यात आला आहे. यामध्ये पांडुरंग रघुनाथ कुंभार वय. 32 हा मयत झाला आहे. मित्राने घेतलेले उसने दोन हजार रुपये परत मागितल्याने ही घटना घडल्याने गावात आणि जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.संशयित कोल्हापूर जिल्ह्यातील असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. शिल्लक कारणावरून थेट खून करण्यापर्यंत तरुणांची मजल चालल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. या खुनामुळे कितीतरी कुटुंबे पूर्ण उध्वस्त होऊ लागली आहेत. शिल्लक कारणावरून रागाच्या भरात तरुण चुकीचे कृत्य करू लागलेत. त्यानंतर मात्र त्यांच्यावर पश्चातापाची वेळ येते.
करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा