मुख्य सामग्रीवर वगळा

सांगलीत संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबीराला मोठा प्रतिसाद

                                                                    सांगली --संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फौडेंशनच्या वतीने बचत भवन जत येथे आयोजित रक्तदान शिबिरात 126 भक्तांनी उत्फुर्त सहभाग घेतला.
    कार्यक्रमाचे उद्घाटन जतचे पोलीस उपविभाग अधिकारी सुनील साळुंखे साहेब यांचे हस्ते दिप प्रज्वलित करून झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले," देशाला शांती देण्याचे महान कार्य निरंकारी मंडळ करित आहे.आपण आज पाहतो आहे जगामध्ये हिंसाचारापोटी अनेकांचे रक्त नाल्यामध्ये फुकटचे व्यर्थ जात आहे.निरंकारी मंडळाचा उद्देश चांगला आहे. रक्त नाल्यामध्ये न वाहता मानवांच्या नसामध्ये वाहिले पाहिजे .आजच्या काळात मंडळाच्या विचारधारेची गरज आहे. त्यांनी मिशनच्या मानवतावादी कार्यास शुभेच्छा दिल्या.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज रक्तपेढी मार्फत रक्त संकलन करण्यात आले. रक्तपेढीचे डॉ जगदीश कुमार रक्तदानाचे महत्त्व सांगताना म्हणाले," एका व्यक्तीने जर रक्तदान केले तर तीन लोकांना जीवनदान मिळु शकते."  यावेळी  देवराजजी काळे,स्टेट बँकेचे शाखाधिकारी रोहित नायकुडे, अविनाश साळुंखे,तहसील विभागाचे लक्ष्मण तोटावाड तसेच स्थानिक प्रबंधक व सेवादल अधिकारी उपस्थित होते. 
  त्यानंतर दुपारी आयोजित सत्संग समारोहामध्ये १०  वी १२ वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विध्यार्थ्यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास पंचायत समिती जत चे गट विकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्व कार्यक्रमाचे उत्तम नियोजन जत शाखेचे मुखी जोतिबा गोरे तसेच संभाजी साळे यांचे मार्गदर्शनाखाली  सेवादल स्वयंसेवकांचे सहकार्याने करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते