आटपाडी ता. 26- शेटफळे (ता. आटपाडी) येथे बहुजन विकास विचार मंचाने छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी केली. शेटफळे ता. आटपाडी येथे बहुजन विचार मंचाने छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती सोहळ्याचे आयोजन केले होते. ग दि माडगूळकर स्मारकामध्ये हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतंगराव गायकवाड होते. स्वागत आणि प्रास्ताविक प्रा. सी. पी. गायकवाड यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी सामाजिक कार्याबद्दल गावचे सुपुत्र पतंगराव गायकवाड सेवानिवृत्ती बद्दल प्रा. डॉ. सयाजीराजे मोकाशी, एम.आर. गायकवाड आणि माणगंगा साखर कारखान्याच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल किसनराव गायकवाड यांचा विचार मंचाने सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. यावेळी सयाजीराजे मोकाशी, पतंगराव गायकवाड आणि अजित गायकवाड यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्यावर व्याख्यान झाले. आर. बी. गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रा. संभाजीराव पाटील, दत्तात्रय कांबळे, एस. एस. गायकवाड, वामनराव गायकवाड, पांडुरंग देशमुख, अण्णा भोरे, उपसरपंच ज्ञानेश्वर वाघमारे, मोहनराव मोकाशी, एकनाथ शिंदे, राजेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.
करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा