मुख्य सामग्रीवर वगळा

शेतकऱ्यांचा अंत पाहू नका--डॉ. भारत पाटणकर यांचा ठेकेदार आणि प्रशासनाला इशारा

आटपाडी ता.21-  आमच्या संयमाचा अंत पाहू नका. कारणे तर अजिबात सांगू नका, शंभर शंभर किलोमीटरवर लांब चरी काढून माळावर पसरलेल्या पाईप 30 जुलै पर्यंत जोडून कामे तातडीने पूर्ण करावीत, अन्यथा 1 ऑगस्ट पासून पासून तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांसोबत बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा पाणी चळवळीने काढलेल्या मोर्चात आज दिला. मोर्चाचे नेतृत्व डॉ. भारत पाटणकर यांनी केले होते.        टेंभू योजनेच्या बंदिस्त पाईपलाईनची रखडलेली कामे आणि वंचित गावांना नविन सुधारीत प्रशासकीय मान्यता देऊन कामे सुरू करावीत, या मागणीसाठी श्रमिक मुक्ती दल आणि पाणी चळवळीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. बसस्थानक पासून मोर्चाची सुरूवात केली. मुख्य पेठेतून जोरदार घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचला. मोर्चात आनंदराव पाटील, हणमंतराव देशमुख, साहेबराव चवरे, जनार्दन झिंबल आदी सहभागी झाले होते. तहसील कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यानंतर तिथे आनंदराव पाटील, मनोहर विभुते, प्रा.विजय शिंदे,साहेबराव चवरे, हणमंतराव देशमुख यांची भाषणे झाली. डॉ. भारत पाटणकर यांनी यावेळी मोर्चातील प्रमुख नेते मंडळींची भाषणे झाली. त्यानंतर कार्यालयात प्रशासन आणि आंदोलकांची बैठक झाली. यावेळी प्रताधिकार, तहसीलदार बी. एस. माने, टेंभूचे उपविभागीय अधिकारी एम.डी. वाखाडे,दिपक मोरे प्रमुख उपस्थित होते. बैठकीत आंदोलकांनी त्यांच्या मागण्यावर अधिकारयाशी चर्चा केली. यावेळी श्री. वाखाडे यांनी बंदिस्त पाईपलाईनची झालेली कामे, चालू कामे आणि राहिलेल्या कामाची माहिती दिली. कामाची मुदत जुलै अखेर असून पाईप जोडण्यासाठी लागणारे रिडयुसरची टंचाई असल्यामुळे वेळ लागत असल्याचे सांगून मुदतीत कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी ठेकेदार आणि आंदोलकांची लवकरच बैठक घेऊन अडचणी सोडविण्याचे ठरले.यावेळी आंदोलकांनी शिवारात चरी खोदून पाईप अनेक दिवसांपासून टाकल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. ‌वचित गावच्या योजनेला सुधारीत प्रशासकीय मंजुरी घेऊन तातडीने कामे सुरू करण्याची मागणी केली. मोर्चात महादेव देशमुख, प्रा. सी.पी.गायकवाड, डी.टी.पाटील, मनोज विभुते, प्रा. विजय शिंदे, पतंगराव गायकवाड, राहुल गुरव, वसंत पाटील, दादासाहेब मरगळे, मनोज मरगळे आदी सहभागी झाले होते.                            

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते