आटपाडी ता.१२-येथील माणनगंगा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांचे बंधू शिवाजीराव पाटील यांची तर उपाध्यक्षपदी ब्रह्मदेव होनमाने यांची एकमताने बिनविरोध निवड आज पार पडली. निवडीनंतर तालुक्यातून मोठ्या संख्येने आलेले कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून कामासाठी शुभेच्छा दिल्या. येथील माणगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली होती. कारखान्यामध्ये पहिल्यांदाच सत्तांतर होऊन जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्याकडे कारखान्याची सत्ता आली आहे. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांची कारखान्यावर स्थापनेपासून 37 वर्षेची एकहाती सत्ता होती. गेल्या पाच वर्षापासून कारखाना बंद असल्यामुळे शेतकरी आणि सभासदात संचालकाबद्दल असंतोष होता. त्या संधीचा फायदा घेऊन तानाजीराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. देशमुख गटाने ही उमेदवारी अर्ज भरले होते मात्र अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यातून देशमुख यांनी शेवटच्या क्षणी सर्वच उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने निवडणूक बिनविरोध होऊन तानाजीराव पाटील यांच्याकडे कारखान्याची सत्ता गेली होती. आज कारखान्याच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवड पार पडली. यामध्ये तानाजीराव पाटील यांचे ज्येष्ठ बंधू शिवाजीराव भगवानराव पाटील यांची अध्यक्षपदी तर ब्रह्मदेव होनमाने यांची उपाध्यक्षपदी एकमताने बिनविरोध निवड पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंगेश सूर्यवंशी यांनी काम पाहिले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी येणाऱ्या हंगामा अगोदर कारखाना कोणत्याही परिस्थितीत सुरू करून सभासद शेतकऱ्यांना न्याय देणार असल्याची ग्वाही दिली. कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मोटे, संचालक अनिल कदम, किसनराव गायकवाड, माजी उपसभापती बापूसो पुजारी, दिघंचीचे माजी सरपंच अमोल मोरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख साहेबराव पाटील, बाजार समितीचे उपसभापती राहुल गायकवाड, दत्तात्रय पाटील, बाळासाहेब होनराव,दादासो पवार, बंडू कातुरे, संजय वाघमारे आदी उपस्थित होते. जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. फोटो-१) आटपाडी येथे माणगंगा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी शिवाजीराव पाटील यांची तर उपाध्यक्षपदी ब्रह्मदेव होनमाने यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर तानाजीराव पाटील आणि कार्यकर्त्यांनी सत्कार केला.
करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा