मुख्य सामग्रीवर वगळा

माणगंगेच्या लढतीत सर्वच पातळीवर तानाजीराव पाटील सरस

आटपाडी येथील माणगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीत जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी सांगोला तालुक्यातील नेत्यांचा मिळवलेलख पाठिंबा, टाकलेल्या सोंगट्या, रचलेले डाव आणि कारखाना सभासदांचा ठेवून सुरू करण्याचा नेते मंडळींचा संपादन केलेला विश्वास, या जोरावरच माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांना माणगंगेच्या आखाड्यातून माघारी घ्यावी लागली. माणगंगेच्या आखाड्यात देशमुख यांच्या तुलनेत तानाजीराव पाटील डावपेच्यात सरस ठरल्याने यश मिळाले.                                   येथील मानगंगा साखर कारखान्याचे आटपाडी, सांगोला, आणि माण हे तीन तालुके कार्यक्षेत्र आहे. आटपाडी आणि सांगोला तालुक्यात सभासदांची संख्या मोठी आहे. सांगोला तालुक्यातील सभासद शेतकरी दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्याशी निगडित आहेत. गेल्या पाच वर्षापासून माणगंगा कारखाना बंद आहे. त्यातच टेंभू योजनेचे पाणी आटपाडी आणि सांगोला तालुक्यात आल्यामुळे ऊस लागवडीखालील क्षेत्रात वाढ होत चालले आहे. वाढत चाललेल्या उसाची समस्या दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत चालली आहे. नेमकी या गंभीर समस्येत तानाजीराव पाटील यांनी संधी शोधली आणि कारखान्याच्या निवडणुकीत यश मिळवणे. सांगोला तालुक्यातील आमदार शहाजी पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे आणि दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा शेतकऱ्यांची देणे देण्याबरोबरच कारखाना सभासदांचा ठेवून चालू करण्याचा विश्वास मिळवण्यात यश मिळवले. त्यामुळेच सांगोला तालुक्यातील एकमेकांचे तिन्ही विरोधक तानाजीराव पाटील यांनी कारखान्याच्या निमित्ताने पाठिंबा मिळवण्यात यश मिळवले. हे काम इतके सोपे नक्कीच नव्हते. तुलनेत राजेंद्रअण्णा देशमुख यामध्ये खूपच कमी पडले. गेली 40 वर्षे दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांना सोबत घेऊन कारखान्याची निवडणूक लढवत होते. तीच परंपरा त्यांनी यावेळी कायम ठेवली मात्र गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख त्यांच्यासोबत शेवटपर्यंत राहिले नाहीत. त्यांनी देशमुखांच्या पॅनेलमधून कार्यकर्त्यांचे भरलेले पाच उमेदवारी अर्ज शेवटच्या दिवशी माघारी घेतले. तिथेच निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट झाल्याने देशमुखाना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली. सर्व शेतकऱ्यांची देणे देऊन कारखाना सभासदांचा ठेवून चालू करण्याचा विश्वास नेते मंडळी, कार्यकर्ते आणि लोकांचा मिळवण्यात देशमुख यांना अपयश आले. यामागे अनेक कारणे आहेत. याशिवाय समोर डावपेच्यात सरस विरोधक असल्याचे माहित असतानाही उमेदवारी अर्ज भरताना गाफील राहिले. उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी 'बी' प्लॅन तयार ठेवला नाही.                                   तानाजीराव पाटील यांचे कारखाना निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच रचलेले डावपेच यशस्वी होत गेले. सांगोला तालुक्यातील एकमेकांचे विरोधक असलेल्या तिन्ही दिग्गज नेत्यांचा पाठिंबा आणि कारखाना सुरू करण्याचा विश्वास मिळवण्यात यश मिळवले. ही सर्वात मोठी जमेची बाजू ठरली. तानाजीराव पाटील यांच्यावर वरिष्ठ पातळीवरून दबाव आणून माघारी घेण्यासाठी डाव टाकले होते मात्र ते त्यात अडकले नाहीत. त्यांनी विरोधकांचे डाव परतावून लावताना त्यांच्यावरच डाव टाकले. परिणामी कारखान्यावरची 37 वर्षाची सत्ता देशमुख यांना सोडावी लागली. बंद असलेला कारखाना तानाजीराव पाटील यांनी निवडणुकीतून मिळवला असला तरी आत्ता त्यांच्यापुढे कारखाना सुरू करण्याचे अत्यंत कडवे आव्हान असणार आहे. येणाऱ्या काळात ते काय करतात, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.  कारखाना सभासदांचा ठेवून नीट चालू करू शकतो याचा विश्वास बांधावरच्या शेतकऱ्यापासून कार्यकर्ते आणि नेते मंडळींना आहे. मी जे बोलतो ते करून दाखवतो. तुलनेत विरोधक समोरच्यांचा विश्वास मिळवण्यात पात्र ठरले नाहीत. कारखाना सर्वांच्या आशीर्वादाने सुरू करून सर्वांच्या विश्वासात पात्र राहण्याची ग्वाही तानाजीराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते