मुख्य सामग्रीवर वगळा

बँकेची सत्ता गेल्याने तोल ढासाळलेल्या "या" विरोधकांच्या खोट्या आरोपांना भीक घालणार नाही- शरद चव्हाण

आटपाडी ता.९- मागील काही दिवसापासून शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष यु. टी. जाधव यांचा सत्ता गेल्यामुळे तोल ढासळला आहे. ते जाणीवपूर्वक अत्यंत खोटी माहिती प्रसिद्धी माध्यमांना सांगून बँकेची बदनामी करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. आमचा बँकेत कारभार अत्यंत पारदर्शी, स्वच्छ आणि सभासदांच्या हिताचा सुरू असल्याचे संचालक शरद चव्हाण यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.      ते म्हणाले,"सध्या जे खोटी माहिती सांगून बँकेची बदनामी करत आहेत त्यांच्याच मागील दहा वर्षाच्या कार्यकाळात बँकेत भ्रष्टाचाराने कळस गाठला होता. त्यामुळेच बँकेत ऐतिहासिक सत्तांतर झाले. कर्मचाऱ्यावर चुकीचे बक्षीस आणि बोनस पगाराची खैरात वाटून स्वतः "त्या" संचालकांनी मोठा वाटा घेतला. बँकेच्या प्रचंड व्याजदरामुळे बहुतांश सभासद इतर बँकाकडे वळलेले होते. अशा अनेक कारणामुळे सभासदांनीच बँकेच्या इतिहासात सर्वाधिक मताधिक्याने नुतन संचालकाना निवडून दिले. निकालानंतर नुतन संचालक मंडळाने बँकेच्या कामात मोठा बदल केला आहे. तो सभासदांनाच दिसून आला आहे. इतर सहकारी अथवा राष्ट्रीयकृत बँकेच्या कर्जाचा व्याजदर 10% पेक्षा जास्त असताना शिक्षक बँकेचा कर्जाचा व्याजदर आम्ही 9% वर आणला आहे. हे पहिल्यांदाच घडवले आहे. शिवाय कर्ज आणि ठेवी यातील व्याजदरातील  तफावत म्हणजे मार्जिन रेट सर्वात कमी म्हणजे  1.5 टक्यावर आणला आहे.  सांगली जिल्ह्यातील 350 नवीन शिक्षकांनी बँकेचे सभासदत्व स्वीकारले आहे. सभासदांना  घरात बसून खात्यावरील व्यवहार पाहण्यासाठी  नवीन ॲप विकसित केलेले आहे. भ्रष्ट कारभाराला वैतागुन मागील कार्यकाळात राजीनामा दिलेल्या अनेक सभासदांना बँकेने नाममात्र वर्गणी भरून सभासद केले आहे. बँकेचा कारभार ठेवीदार आणि सभासदांच्या हिताचा सुरू असल्याने माजी अध्यक्ष यु. टी. जाधव आणि त्यांच्या टिमचा पोटशुळ उठला आहे. सांगलीत बँकेची मुख्य शाखेची उभारणार आहोत.तेच पचनी पडत नाही. अध्यक्ष विनायकराव शिंदे आणि उपाध्यक्ष अनिता काटे आणि नुतन संचालक मंडळ सभासदांच्या हिताचे कामकाज करत असून आम्ही विरोधकांच्या चुकीच्या आरोपांना भीक घालत नाही. आमच्या चांगल्या कारभारात कोणताच फरक पडणार नसल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. पेपरबाजी आणि मीडियात खोटं सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष बँकेत भ्रष्टाचारमुक्त व कार्यक्षम कारभारावर भर असल्याचे श्री. शरद चव्हाण यांनी स्पष्ट केले. यावेळी शिक्षक संघ थोरात गटाचे तालुकाध्यक्ष आसिफ मुजावर, शिक्षक शि. द.पाटील गटाचे तालुकाध्यक्ष यशवंत आप्पा गोडसे, जुनी पेन्शनचे तालुकाध्यक्ष नितीन गळवे व स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळातील 50 शिक्षक बांधव उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते