मुख्य सामग्रीवर वगळा

डॉ. विजयालक्ष्मी शिंदे यांना पीएचडी प्रधान

पुणे -11-पर्यावरण शास्त्राच्या विभाग प्रमुख* सौ डॉ विजयालक्ष्मी राजीव शिंदे  अबेदा इनामदार सीनियर कॉलेज कॅम्प, पुणे यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून नुकतीच पर्यावरणशास्त्रातील *पी.एचडी.* जाहीर झाली. त्यांचा संशोधन विषय हा " इकॉलॉजिकल असेसमेंट ऑफ अर्बन ग्रीन स्पेसेस अँड इट्स पोटेन्शियल फोर प्रोवायडींग इकॉलॉजिकल सर्विसेस विथ स्पेशल रेफरन्स टू कार्बन सिक्वेस्ट्रेशन पोटेन्शिअल".
यासाठी यांना डॉक्टर ज्ञानेश्वर महाजन व डॉक्टर व्ही. आर. गुणाले सर आणि प्राचार्य डॉक्टर शैला बूटवाला यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
त्याचबरोबर घरातील स्मृतिगंध शारदाताई अंबादास शिंदे व अंबादास सैदु शिंदे, डॉक्टर विजय दत्तात्रय महिंद्रकर व डॉक्टर शामला महिंद्रकर यांचे अनमोल सहकार्य व आशीर्वाद लाभले.
यापूर्वी त्यांनी पर्यावरण विषयातच नैपुण्य प्राप्त करत त्यांनी एम. एस. सी.M.Sc पर्यावरण शास्त्र मध्ये विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या.
इतर शैक्षणिक प्राविण्य खालील प्रमाणे:
SET व UGC-NET
Diploma in Environmental Management and ISO 14000.पर्यावरण नियोजन व व्यवस्थापन ISO-14000)
Diploma in Pollution Control.प्रदूषण नियंत्रण
4)Expert in Environmental Auditपर्यावरणातील लेखापरीक्षण
  पर्यावरण शास्त्रातील एम. फिल डिग्री प्राप्त केलेले आहे.
 पर्यावरण विषयासाठी व्हीसी नॉमिनी म्हणून फर्ग्युसन कॉलेज येथे नेमणूक करण्यात आली आहे.
 पर्यावरण शास्त्रातील  पुस्तके प्रकाशित.
 पर्यावरण विषयावर  संशोधन पेपर* प्रकाशित.
 आदर्श प्राध्यापिका म्हणून सर्वपल्ली राधाकृष्णन पुरस्काराने सन्मानित.2014 मध्ये भारतातील पर्यावरणासाठी स्वतंत्र विद्यापीठ मागणी करणाऱ्या डॉक्टर विजयालक्ष्मी राजीव शिंदे या आहेत.
पर्यावरण विषयातील पीएचडी प्राप्त केल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे तसेच चैतन्य हास्ययोग धानोरी यांच्यातर्फे देखील त्यांचा सत्कार करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते