आटपाडी - पांढऱ्या सोन्यासाठी कधीकाळी प्रसिद्ध असलेल्या आटपाडी तालुक्यात यंदा एकतपा नंतर दीड ते दोन हजार एकर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. त्यामुळे यंदापासून आटपाडीच्या बाजारपेठेला कापसाचे गतवैभव मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. सांगली जिल्हात एकमेव आटपाडी तालुक्यात अत्यंत चांगल्या आणि लांब धाग्याचा कापूस पिकत होता. दर्जेदार कापूस उत्पादनासाठी आटपाडीचा नावलौकिक होता. तालुक्यात १९९० पासून लागवडीची सुरूवात झाली होती. शेतकरयांना हमखास पैसे देणारे पिक असल्यामुळे अल्पावधीत लागवडीचे क्षेत्र वाढले. आटपाडीच्या बाजारपेठा कापसाने गजबजल्या होत्या. बेळगांव,आथणी, विजापूर या भागातून कापूस खरेदीसाठी व्यापारी तळ ठोकूनच असायचे. रोज पाच पंचवीस ट्रक भरून कापूस पर राज्यात जात होता. आटपाडी, करगणी, खरसुंडी, दिघंची आणि झरे गावचे आठवडा बाजार कापसाच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध झाले होते. साधारण तीन महिने कापसाचा हंगाम चालू राहायचा. तिथे मोठी आर्थिक उलाढाल होत होती. 2010 ते 12 दरम्यान कापसाचे बोगस बियाणे लागल्यामुळे त्यावर्षी कसलेच उत्पादन निघाले नाही. कापसाची लागवड मोठ्या क्षेत्रावर झाली होती मात्र बोगस बियाणाचा शेतकऱ्यांना फटका बसला. तज्ञ अभ्यासकांनी भेटी देऊन बोगस बियाणाबरोबरच वाढत चाललेले तापमानामुळे उत्पादन निघाले नसल्याचा निष्कर्ष काढला होता. त्यावेळी बोगस बियाणाचा विषय प्रचंड गाजला. शेतकऱ्यांनी मोर्चे काढले. तेव्हापासून कापूस लागवड पूर्ण ठप्प झाली. बोगस बियाणामुळे कापूस लागवडीचे शेतकरी धाडस करत नव्हते. मात्र गेल्या वर्षीपासून कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे कापूस बियाणाचा थेट पुरवठा सुरू केल्यामुळे कापूस लागवड केली जाऊ लागली आहे. गेल्या वर्षी नाममात्र दोनशे एकर क्षेत्रावर प्रायोगिक तत्त्वावर नवीन बियाणाची लागवड केली होती. ती यशस्वी झाल्यामुळे यंदा दीड ते दोन हजार एकर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. बाजार समितीच्या माध्यमातून हजार ते बाराशे एकर क्षेत्रावर बियाणे पुरवले आहे तर इतर शेतकऱ्यांनी थेट विद्यापीठातून बियाणे खरेदी केले आहेत. सध्या कापसाची लागवड होऊन तीन ते साडेतीन फूट उंच कापूस झाला आहे. निकोप कापसाची वाढ झाली आहे. तसेच मोठ्या संख्येने कापसाचे बोंडे ही आली आहेत. लवकरच प्रत्यक्ष कापसाचे उत्पादन सुरू होणार आहे. एक तपानंतर आटपाडी तालुक्यात कापूस फुलताना दिसू लागला आहे. फोटो-१) आटपाडी तालुक्यात यंदा शेतकऱ्यांनी लागवड केलेला कापूस.
करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा