मुख्य सामग्रीवर वगळा

स्वातंत्र्यपूर्व वसाहतीमधील कैद्यांचे खुले कारागृह पाहून 'ते'' भारावले

                                                                  आटपाडी -येथील स्वातंत्र्यपुर वसाहतीमधील कैद्यांच्या खुल्या कारागृहाला मध्यप्रदेशचे शिक्षण मंत्री जयभान सिंक पवैयया यांनी भेट दिली. कैद्यासाठी असलेल्या या खुले कारागृह पाहून ते भारावले. गेल्या नऊ वर्षात मोदी सरकारने विविध नऊ कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचे जीवनमान उंचावण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन मध्य प्रदेशचे शिक्षण मंत्री जयभान सिंग पवैयया यांनी केले. त्यांनी आटपाडीतील स्वातंत्र्यपूर्व साती मधील कायद्यांच्या खुल्या कारागृहाला भेट दिली. त्यानंतर पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते.                                                          केंद्रातील भाजप सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने मोदी @ ९ जनसंपर्क अभियानाचे भाजपने देशभर आयोजन केले आहे. या अभियानांतर्गत देशातील विकास तीर्थना भेटी दिल्या जातात. आटपाडी तालुक्यात खरसुंडी येथील श्री सिद्धनाथचे दर्शन घेऊन आटपाडीतील स्वतंत्रपूर येथील कैद्यांच्या खुल्या कारागृहाला भेट दिली. तिथे खुल्या कारागृहाची माहिती घेतली. तसेच तेथे  टिफिन बैठक पार पडली. यावेळी श्री. पवैयया यांचे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख आणि समाज कल्याणचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी पुष्पगुच्छ देऊन सामुदायिक स्वागत केले. स्वागत आणि प्रास्ताविक भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रणव गुरव यांनी केले. यावेळी जयभान सिंग पवैयया म्हणाले,"महा जनसंपर्क अभियान पूर्ण क्षमतेने देशभर सुरू केले आहे. या माध्यमातून विकास तीर्थ दर्शन योजनेच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांना भेटी दिल्या जाणार असून लोकांशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाणार आहे.कार्यकर्त्यांची समस्या ऐकून त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील भाजप सरकार राहील. गेल्या नऊ वर्षात मोदी सरकारने नऊ कल्याणकारी योजना राबवल्यामुळे सर्व सामान्य लोकांची मने जिंकली आहेत. या योजनामुळे सर्वसामान्य लोकांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली असल्याचे सांगितले.'यावेळी खासदार संजय पाटील यांनी मोदी @ 9 महाजनसंपर्क अभियान सांगली जिल्ह्यात पुर्ण क्षमतेने राबवले असल्याचे सांगितले. तसेच जिल्ह्यात विविध विकास कामासाठी सिंचन योजनेसाठी मोदी सरकारने निधी दिल्याचे सांगितले. यावेळी भाजपचे दीपक म्हैशाळकर, जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याणचे माजी सभापती प्रमोद शेंडगे,अनिल पाटील, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रणव गुरव, अमोल काटकर, भाजपचे तालुकाध्यक्ष उमाजी सरगर, जयवंत सरगर आबास पुजारी, विष्णुपंत अर्जुन अनुपस्थित होते.          

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते