आटपाडी ता.२३-येथील श्री. गणेश नॉन ॲग्रीकल्चर रुलर को- ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या अध्यक्षफदी डॉ. विष्णू पाटील यांची तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब सागर यांची एकमताने बिनविरोध निवड केली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम. बी. कुलकर्णी यांनी काम पाहिले.
2005 मध्ये कै. तानाजी केदार यांच्या प्रेरणातून सुरेश चव्हाण यांनी गणेश पतसंस्थेची स्थापना केली होती. संस्थेचे खेळते भाग भांडवल पाच कोटी असून
तीन कोटी साठ लाख ठेवी आहेत. तर कर्ज तीन कोटी 20 लाखाचे वाटप केले आहे. एकूण गुंतवणूक 55 लाख आहे. ऑडिट वर्ग 'अ' सतत आहे. मार्च 2023 अखेर तीन लाख 25 हजार नफा झाला आहे. स्वतःचे लॉकर, सोने तारण कर्ज सुविधा व अन्य कर्ज योजना राबवल्या आहेत. संस्थेची स्थापनेपासून बिनविरोध निवडणूकीची परंपरा आहे. ती यंदाही कायम ठेवली. संचालकांची निवड बिनविरोध झाली.यात बापूराव मगर, महादेव चव्हाण, आनंदराव पाटील, सर्जेराव चव्हाण, स्वाती देशपांडे, छाया अवताडे,शुभम सित्रे, ब्रह्मदेव माने यांची निवड बिनविरोध झाली. संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. विष्णू पाटील यांची तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब सागर यांची एकमताने बिनविरोध निवड केली.यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश चव्हाण यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा