सांगली ता.२५ : सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यातील उपविभागीय, तहसिल कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर जातीचे व अन्य दाखले मागणीसाठी अर्ज प्राप्त होत आहेत. दाखले ऑनलाईन पद्धतीने तयार करून वितरीत करण्याची प्रणाली कार्यरत आहे. काही उपविभागीय, तहसिल कार्यालयाच्या ठिकाणी ऑनलाईन कामकाजामध्ये सर्व्हरची गती अतिशय कमी असल्याने दाखले तपासणे व ते मंजूर करून वितरीत करण्यास विलंब होत आहे. सर्व्हरच्या त्रुटीबाबत शासन स्तरावर अवगत करण्यात आले असून त्याअनुषंगाने शासन स्तरावर तक्रारीची नोंद घेवून अतिरिक्त सर्व्हर बसविण्याचे कामकाज शासन स्तरावर सुरु आहे व ते कामकाज येत्या २ दिवसात पूर्ण होणार आहे. त्यामुळे दाखले वितरणाचे काम येत्या २ दिवसानंतर सुरळीत सुरु होत आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा प्रशासनामार्फत प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.
महसूल प्रशासनामार्फत दाखले वितरीत करण्याबाबत कामकाज केले जाते. प्राप्त अर्जांवर महसूल कार्यालयीन कर्मचारी व अधिकाऱ्यांना कार्यालयीन वेळेपूर्वी व कार्यालयीन वेळेनंतर ज्यावेळी सर्व्हर गतिमान असेल त्यावेळी कार्यालयात उपस्थित राहून दाखले वितरणाचे कामकाज करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून क्षेत्रीय महसूल कार्यालयांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याप्रमाणे कामकाज सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनामार्फत पत्रकाव्दारे कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा