मुख्य सामग्रीवर वगळा

आटपाडी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षपदी उत्तम बालटे

आटपाडी ता. 20- येथील आटपाडी क्रेडिट को-ऑफ क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षपदी उत्तम बालटे तर उपाध्यक्षपदी सोमनाथ जाधव यांची बिनविरोध निवड झाली.                                          पाच वर्षांपूर्वी संस्थापक अध्यक्ष उत्तम बालटे यांनी आटपाडीकरांची गरज लक्षात घेऊन आटपाडी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापना केली होती. संस्थेची आटपाडीत एक शाखा आहे. अडीच कोटी वर ठेवी आहेत. सहाय्यक निबंध विभागातील अधिकारी उदय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेची निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी बी. एस. बारवकर प्रमुख उपस्थित होते.संस्थेच्या सदस्यांची निवड बिनविरोध झाली. यात दादासो पुजारी, प्रशांत माळी, बॅरिस्टर मुलांनी, रणजीत ऐवळे, स्वप्निल टकले, रवींद्र सागर, अर्जुन लांडगे, वैशाली बालटे, रूपाली बालटे या सदस्यांची निवडणूक बिनविरोध झाली.त्यानंतर संस्थेच्या अध्यक्षपदी उत्तम बालटे आणि उपाध्यक्षपदी सोमनाथ जाधव यांचे एकमेव अर्ज दाखल असल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोघांचीही निवड बिनविरोध जाहीर केली. निवडीनंतर अध्यक्ष,उपाध्यक्ष आणि नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.               

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते