मुख्य सामग्रीवर वगळा

पाणी चळवळीचा मंगळवारी "या" मागणीसाठी तहसीलवर मोर्चा

आटपाडी - टेंभू योजनेच्या बंदिस्त पाईपलाईन पथदर्शी प्रकल्पाच्या पाईपाची जोडणी करून चरीत बुजवून आराखड्याप्रमाणे आउटलेट काढून तेथून प्रत्यक्षात पाणी चालू करावे आणि वंचित गावांचा अंदाजपत्रक तयार करून तातडीने निधी द्यावा, यासाठी मंगळवार ता. 21 जून रोजी डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे अहवाल पाणी चळवळीचे नेते आनंदराव पाटील यांनी केले आहे.                         मंगळवार ता. 21 रोजी सकाळी दहा वाजता हा मोर्चा बस स्थानकापासून निघणार आहे. मोर्चाच्या तयारीच्या दृष्टीने आनंदराव पाटील यांनी गावोगावी भेटी देऊन शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्या आहेत. आटपाडी तालुक्यात टेंभूवर बंदिस्त पाईपलाईनने पाणी शेतीला देणारा पददर्शी प्रकल्प राबवला आहे. याची 80 टक्के कामे पूर्ण झालीत मात्र अत्यंत महत्त्वाची शेवटच्या टप्प्यातील  कामे थांबली आहेत. संपुर्ण तालुकाभर  पाईपाच्याचरी काढल्या आहेत. पाइपाही अनेक महिन्यांपासून उघड्यावर उन्हात टाकल्या आहेत. त्या जोडून जरी बुजून आउटलेट काढलेली नाहीत. त्यामुळे किरकोळ कामाच्या अभावी अनेक भागात पाणी देण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. तसेच या पाईपा डीजनरेट होण्याचीही शक्यता आहे. गेल्या चार महिन्यापासून काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. अनेक भागात तर कामे बंद आहेत.  त्यामुळे तातडीने चरीत पाईपा टाकून बुजवून आराखड्याप्रमाणे आउटलेट काढण्याची कामे तातडीने सुरू करावीत, अशी मागणी पाणी चळवळीने लावून धरली आहे. पाईपाच पुरल्या नसल्यामुळे आणि आउटलेट जोडले नसल्यामुळे अनेक भागात शेतीला पाणी देता येत नाही. आटपाडी आणि घाणंद या मुख्यवाहिकेवरील मोठी कामे प्रलंबित आहेत. तेथील सर्व नकाशे तयार करून लाभधारक कुटुंबाच्या याद्या बनवण्याची आवश्यकता आहे. तसेच टेंभूच्या पाण्यापासून तालुक्यातील राजेवाडी, पुजारवाडी,(दिघंची), पांढरेवाडी, उंबरगाव,पिंपरी, आंबेवाडी, बोबेवाडी, गुळेवाडी, विभूतवाडी, घरनिकी, वलवन, चिंचाळे,खरसुंडी, औवटेवाडी आणि धावडवाडी गावांना सिंचनाची सुविधा देण्याच्या दृष्टीने तातडीने अंदाजपत्रक बनवून निधी देऊन कामे सुरू करण्याची प्रमुख मागणी आहे. या मागण्यासाठी मंगळवार ता. 21 जून रोजी सकाळी दहा वाजता बसस्थानकापासून तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले असून मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते