आटपाडी --कृष्णा खोऱ्यातील तेरा दुष्काळी तालुक्याची यंदाची 31 वी पाणी परिषद मंगळवेढा येथे 26 जुनला प्रा. शिवाजीराव काळुंगे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती पाणी परिषदेचे निमंत्रक वैभव नायकवडी यांनी दिली. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी 1993 मध्ये पहिल्यांदा आटपाडी तालुक्यात 13 दुष्काळी तालुक्यांची पाणी परिषद घेतली होती. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी आणि कै. गणपतराव देशमुख यांनी दुष्काळी तालुक्यांना सिंचन योजना चे पाणी द्यावे यासाठी राज्य सरकारचे संघर्ष चालू केला. दुष्काळी तालुक्यांना कृष्णा खोऱ्याचे पाणी द्यावे, अशी प्रमुख मागणी पाणी परिषदेच्या व्यासपीठावरून केली जात होती. क्रांतिवीर नागनाथअण्णा नाईकवडी यांच्या पश्चातही पाणी परिषदा सुरू असून आत्तापर्यंत तीस पाणी परिषदा झाल्या आहेत. या पाणी परिषदेच्या माध्यमातूनच अनेक मोर्चे, बहिष्कार आणि विविध प्रकारची आंदोलने उभारली गेली. पाणी परिषदेच्या लढ्याची दखल घेऊन राज्य सरकारने दुष्काळी भागांना पाणी देणाऱ्या उपसा सिंचन योजना मंजूर देऊन प्रत्यक्ष कामे सुरू केली. अनेक योजनांची कामे पूर्ण झाली असून राहिलेल्या सिंचन योजनेची कामे अंतिम टप्प्यात आली आहे. दुष्काळी भागात पाणी पोहोचले असले तरी उर्वरित प्रश्न सोडवण्यासाठी पाणी परिषद चालूच ठेवण्याचा निर्धार परिषदेचे निमंत्रक वैभव नायकवडी यांनी केला आहे. यंदाची पाणी परिषद छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात 26 जुनला दुपारी एक वाजता आयोजित केली आहे. या परिषदेचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव काळुंगे आहेत. राज्य सरकारने म्हैशाळ विस्तारी सिंचन योजनेला मंजुरी देऊन दोन हजार कोटी रुपयाचे आर्थिक तरतूद केली आहे. त्यातून 981 कोटी रुपयांची निविदा काढली आहेत मात्र उर्वरित निविदा काढलेल्या नाहीत. त्या निविदा लवकरात लवकर काढण्याची प्रमुख मागणी या परिषदेत केली जाणार आहे. याशिवाय टेंभू योजनेच्या बंदिस्त पाईपलाईनच्या कामांना गती द्यावी, टेंभू योजनेतून वंचित राहिलेल्या गावांचा समावेश करून त्यांना निधीची तरतूद करून कामे सुरू करावीत,अशा प्रमुख मागण्या या परिषदेत केल्या जाणार असल्याचे निमंत्रक वैभव नायकवडी यांनी सांगितले.
करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा