मुख्य सामग्रीवर वगळा

अहमदनगर मधील एच.आय.व्ही. ग्रस्त आणि सेक्स वर्करच्या मुलांची शाळा जगात भारी,, वर्ल्ड टॉप फाइव्ह मध्ये

जगातील सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्कार जाहीर झाले आहेत. यावर्षी भारतीतील पाच शाळांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये अहमदनगर येथील एचआयव्हीग्रस्त आणि सेक्स वर्करच्या मुलांच्या शाळेने क्रमांक पटकावला आहे. सोबत दिल्ली, गुजरात आणि महाराष्ट्रातील शाळांचाही समावेश आहे. या यादीत महाराष्ट्रातील तीन शाळांचा समावेश आहे. सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्कारच्या माध्यमातून तब्बल अडीच लाख डॉलरचे (US$ 2,50,000) बक्षिस मिळणार आहे. हा पुरस्कार जगभरातील शाळांच्या समाजाच्या प्रगतीमध्ये शाळांचे योगदान पाहून देण्यात येतो. 
जागतिक सर्वोत्तम शाळा पुरस्कारासाठी विविध श्रेणींमध्ये टॉप 10 च्या यादीत निवडण्यात आले आहे. यात महाराष्ट्रातील तीन शाळांचा समावेश आहे. जगातील सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्कार 5 श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत. यात समुदाय सहयोग, पर्यावरण कृती, नवीन उपक्रम, प्रतिकूलतेवर मात करणे आणि निरोगी जीवनास समर्थन देणे यांचा समावेश आहे. या पुरस्काराच्या सहाय्याने समाजाच्या पुढील पिढीच्या विकासात महत्त्वाच्या भूमिकेसाठी शाळांना प्रोत्साहन दिले जाते.
*या भारतीय शाळांचा समावेश*
पुरस्कार मिळालेल्या शाळांमध्ये दिल्ली, गुजरात आणि महाराष्ट्रातील शाळांचा समावेश आहे. यात मुंबईतील दोन आणि अहमदनगर जिल्ह्यातील एका शाळेचा समावेश आहे. दिल्लीतील सरकारी स्कूल  नगर निगम प्रतिभा बालिका विद्यालय (NPBV) F-Block दिलशाद कॉलनी  तसेच या वर्गात मुंबईतील ओबेरॉय इंटरनॅशनल स्कूलचा देखील समावेश आहे. ही खासगी आंतरराष्ट्रीय शाळा आहे. गुजरातमधील रिव्हरसाइड स्कूल, अहमदाबाद ही देखील एक खासगी आंतरराष्ट्रीय शाळा आहे. तर ' स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, महाराष्ट्र ' ही अहमदनगरमधील एक धर्मादाय शाळा आहे. इथे HIV/AIDS ग्रस्त मुलांचे आणि सेक्स वर्कर कुटुंबातील मुलांना शिक्षण देऊन त्यांचे जीवन बदलण्याचे मोठे काम केले जात आहे. पाचवी शाळा मुंबईतील आहे. दादरमधील शिंदेवाडी मुंबई पब्लिक स्कूल. (द आकांक्षा फाउंडेशन), ही शाळा मुंबईतील एक चार्टर स्कूल आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते