मुख्य सामग्रीवर वगळा

'माणगंगा" सुरू करण्याचे नवीन कारभाऱ्यासमोर तगडे आव्हान

आटपाडी येथील बंद असलेल्या माणगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी सत्तांतर घडवत कारखाना ताब्यात घेतला. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने कारखाना सुरू होणे अत्यंत गरजेच आहे. अडचणीच्या चक्रव्यूहातून कारखान्याला बाहेर काढून सुरू करण्याचे कडवे अहवान नूतन सत्ताधाऱ्यासमोर असणार आहे. त्यासाठी सत्ताधरी कोणती पावले टाकतात, याकडे लक्ष लागले आहे.                                                          दुष्काळी टापूतील माणगंगा साखर कारखाना,अशी आटपाडीच्या कारखान्याची ओळख होती. 1986 मध्ये कारखान्याचा पहिला गळीत हंगाम सुरू झाला. गेल्या 37 वर्षात कारखान्याचे 27 गणित हंगाम पार पडले तर दहा वर्षे कारखाना बंद राहिला आहे. यात गेली सलग पाच वर्षे कारखाना बंद राहिला आहे. आटपाडी तालुक्यात पुरेसा ऊस उपलब्ध नसताना बाहेरून ऊस आणून अनेक वेळा कारखाना चालवला गेला होता. अलीकडे टेंभू योजनेचे पाणी शिवारात फिरल आहे. ऊस लागवडीचे क्षेत्र वाढत चालले आहे मात्र या उसाचे करायचे काय याचं कोड शेतकऱ्यासमोर कारखाना बंद असल्यामुळे उभा राहिल आहे. याशिवाय कारखाना बंद असल्यामुळे नवीन ऊस लागवडही थांबली आहे. कारखान्याच्या माध्यमातून पाचशे कोटीवर एका हंगामात उलाढाल होती. मोठी आर्थिक उलाढाल होती. कारखान्याची अत्यंत गरज असताना विविध कारणाने बंद पडल्यामुळे तात्कालीन सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नाराजी  होती. गेली पाच वर्षे कारखाना बंद असताना सत्ताधाऱ्याकडून कारखाना सुरू करण्यासाठी ठोस पावली टाकली नाहीत. त्यामुळे ते पुन्हा कारखाना सुरू करतील यावर लोकात शंका होती.                           अनेक घडामोडी घडल्या आणि जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या ताब्यात माणगंगेची चावी आली. कोणत्याही परिस्थितीत कारखाना सहकारी ठेवून सुरू करू असा आशावाद त्यानी लोकांना दिला आहे. कारखाना ताब्यात घेतला आत्ता मात्र तो सुरू करण्याची जबाबदारी त्यांच्यावर पडली आहे. त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील सर्वात मोठे कडवे आव्हान त्यांच्यासमोर खऱ्या अर्थाने उभा राहिलेले आहे. जिल्हा बँकेसह इतर राष्ट्रीयकृत बँकेची कोट्यवधीची कर्जे कारखान्यावर आहेत. बँकेच्या देणे संदर्भात न्यायालयात वाद सुरू आहे. याशिवाय कामगारांची देणी, ऊस बिले, वाहतूकदारांची देणी हे विषय आहेतच. नूतन संचालक मंडळाला जिल्हा बँकेकडून कारखाना ताब्यात घेण या दिव्य आणि क्लिस्ट प्रक्रियेतून जावं लागणार आहे. सारी कायदेशीर प्रक्रिया करून कारखाना ताब्यात घेतल्यानंतर त्याची दुरुस्तीचा प्रश्न आहेच. पाच वर्षे कारखाना बंद असल्यामुळे मशिनरी गंजून आणि सडून बंद पडलेल्या आहेत. त्याच्या दुरुस्तीसाठी भरमसाठ खर्च असणार आहे. अनेक मशिनरी नव्याने घ्यावी लागणार आहेत. परत सारे कामगार एकत्रित करून सारा बाजार सुरू करावा लागणार आहे. हे अहवान नक्कीच वाटते तितके सोपे नाही. दरम्यान, कारखाना क्षेत्रातील जाणकारांच्या सल्ल्याने प्रक्रिया राबवून जिल्हा बँकेकडून कारखाना लवकरच ताब्यात घेऊ. तो कारखाना सुरू करण्यासंदर्भात वेगवेगळ्या पातळीवर हालचाली सुरू केल्या असून आम्हाला यात निश्चित यश मिळणार असल्याचे तानाजीराव पाटील यांनी सांगितले       

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते