मुख्य सामग्रीवर वगळा

पी. एम. किसान सन्माननिधी कधी जमा होणार ते वाचा

मुंबई- जूनच्या तिसऱ्या आठवड्यात PM किसान सन्मान निधीचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याच्यासोबतच राज्याचाही सन्मान निधी जमा केला जाणार आहे मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप कागदपत्रांची पूर्तता केली नाही, त्या शेतकऱ्यांच्या खात्यात 14 वा हप्ता जमा होणार नाही. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी आधार कार्ड अपडेट केले नाही, त्या शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
*23 जूनपर्यंत कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन*
ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण केली नाही, त्या शेतकऱ्यांनी 23 जूनपर्यंत कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. जे शेतकरी आधीच किसान सन्मान निधी योजनेशी निगडीत आहेत आणि त्यांचे ईकेवायसी पूर्ण झाले नाही, अशा शेतकऱ्यांनी पूर्तता करणं गरजेचं आहे. यासोबतच या योजनेत नुकतेच सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी देखील ई केवायसी करणे बंधनकारक आहे.
 ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी, आधार कार्ड अपडेट केलेले नाहीत, त्यांच्याकडे 23 जूनपर्यंत वेळ आहे. ज्या शेतकऱ्यांची कागदपत्रे पूर्ण आहेत त्यांना या महिन्यातच हप्ता मिळू शकेल. 
गेल्या वेळी 27 फेब्रुवारी रोजी, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 13 वा हप्ता जारी करण्यात आला होता. त्यामुळे केंद्र सरकारकडे 14 वा हप्ता जारी करण्यासाठी जुलै 2023 पर्यंत वेळ आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकार 14 व्या हप्त्याचे पैसे जून ते जुलै दरम्यान कधीही शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवू शकते. याच महिन्यात म्हणजे जूनमध्ये 14 वा हत्पा जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
*नेट वापरणारा शेतकऱ्याने अशी करावी ऑनलाइन केवायसी*
1) ऑनलाइन केवायसी करण्यासाठी, तुम्हाला प्रथम पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जावे लागेल.
2)  या वेबसाइटवर E-KYC पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
3)  E-KYC च्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला तुमचा आधार क्रमांक लिहिण्यासाठी एक जागा मिळेल. त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाईप करावा लागेल.
4)  यानंतर PM किसान सन्मान निधीशी लिंक केलेल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर OTP येईल, तो OTP प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
5) या संपूर्ण प्रक्रियेनंतर, तुमचे केवायसी काम पूर्ण होईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते