मुख्य सामग्रीवर वगळा

शिपुर मध्ये विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी केले जंगी स्वागत

शिपुर- येथील आर. सी. पटेल माध्य व उच्च माध्य विद्यालय खरदे  येथे ५वीत नवीन प्रवेश घेतलेल्या विदयार्थ्यांचे स्वागत व क्रमित पुस्तक वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  गावातील सरपंच सौ. सविताबेन पटेल तर प्रमुख पाहुणे म्हणून मार्केट कमिटीचे मा. संचालक राजकपुर मराठे व ग्रा. प. सदस्य नामदेव पाटील, प्राथ. शाळेच्या मुखयाध्यापिका सौ क्रांती जाधव, प्राचार्य पी.व्ही. पाटील उपस्थित होते. सुरुवातील स्व.खासदार मुकेशभाई पटेल यांना आदरांजली वाहण्यात आली. नंतर पाचवीतील  विद्यार्थ्यांचे औक्षण करून  गुलाबपुष्य देऊन व पेढे भरवून स्वागत करण्यात आले.नंतर इयत्ता पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांना क्रमिक पुस्तकाचे वाटप करण्यात आले. विद्यालयाच प्राचार्य पी व्ही पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतांना शालेय उपक्रम, नियमित अभ्यास शिस्त यातून आपले जीवन घडवावे. आपल्या अडचणी, शंका शिक्षकांना विचाराव्यात असे सांगितले.
गावात रॅली काढून शिक्षणासंदर्भात जनजागृती करण्यात आली. बोलकी घोषवाक्य, बॅण्ड पथक यांनी ग्रामस्थांचे लक्ष वेधुन घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ए जे पाटील यांनी केले व आभार प्रदर्शन अमोल सोनवणे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी 
 विद्यालयाचे प्राचार्य पी .व्ही .पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  पी. बी धायबर, वाय .डी.मिठभाकरे‌ , हितेंद्र देसले,श्रीमती एस. जे. सूर्यवंशी, श्रीमती. एस .आर. निकम,श्रीमती मनीषा पाटील, श्रीमती सीमा जाधव,पी. एस. अटकाळे, बी. एस. बडगुजर, डी .एम. पवार , अमोल सोनवणे,बी .एस .पावरा तसेच शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते