आई",,,, माझी 'आई' निश्चितच देव नव्हती पण माझ्या दृष्टीने माझ्या मंदिरातील देवापेक्षा कमीही नव्हती. ती "आई" च्या रूपात देवमाणूसच होती. तिच्याबद्दल किती लिहावं,बोलावं, सांगावं तेवढं फारच कमी आहे.अपुर आहे. ती माऊली आईच्या रूपातील माझा "देव"च होती. अशा या माझ्या देवाच्या पोटी मी जन्मलो, वाढवलो, तिने संस्कार केले, सोबत दिली. खूप खूप प्रेम दिल. तिच्यावर लिहण्यासाठी शब्दही नाहीत. तिचा स्वभाव खुप शांत, सोज्वळ, संयमी, तेवढीच प्रचंड खंबीर, हळवी, प्रेमळ, नम्र आणि सुसंस्कृत. कुटुंबा आयुष्यभरात कोणाशीही कधीच भांडण नाही. वाद नाही की तंटा नाही. प्रत्येकाला भरभरून प्रेम दिले. मायेचा, प्रेमाचा प्रत्यक्ष ती झराच होती. वडिलांची तब्येत खराब झाल्यावर पंधरा वर्षे कुटुंबात खंबीर उभा राहिली. वडिलांना स्वतापेशाही जास्त जपलं. खूप सेवा केली. तिच्यामुळेच वडील आजारी असतानाही पंधरा वर्षे पुढे आमच्या सोबत राहिले. माझी हार्ट सर्जरी झाल्यानंतर मी पुरता कोलमडलो होतो. यावेळी ही तिनेच मला पुन्हा पुन्हा प्रेरणा देत उभा केल. प्रत्यक्षात मला तिनेच पुर्णजन्मच दिला होता. प्रत्येकाला त्याच्या आईने एखदाच जन्म दिला आहे मला मात्र माझ्या माऊलीने दोन वेळा जन्म दिला. सख्ख्या बहिणीच्या गंभीर अवस्थेत काही महिने तिच्या सोबत तिची राहून सेवा केली. रात्रची सेवा करण्याचे तिने वसा घेतला होता. तिचा 170 बीपी असतानाही सेवेला जराही टाळाटाळ केली नाही. जे व्रत घेतल ते पेलवून दाखवलं. सासू, सासरा, नंदा, सूना, नातवंडांना खूप जिव लावला होता. संपूर्ण आयुष्यत तिच्या तोंडातून चुकुनही किरकोळ "नालायक' असा शब्द कधीच ऐकला मिळाला नाही. कोणालाही दुखावलं नाही. सासूवर लेकीसारखा जीव लावला. नंदावर सख्या बहिणीसारख प्रेम केल. त्यांच्या मुलावर जीव लावला. सुनाना आईचच प्रेम दिल. त्यांच्या साऱ्यांच्या चुका पदरात घेणारी माझी आई होती. कधी कुरकूर नाही की तक्रार नाही. जे आहे त्यात समाधानी असायची.घरातल दुख बाहेर माडंल नाही. कोणाला नावही ठेवली नाहीत.कोणाचच वाईट चिंतलही नाही. कमी पडलं म्हणून तक्रार नाही. जास्त झाल म्हणून मिरवल नाही. मलातर कधीच आणि काहीच मागीतल नाही. डोक्यावर नेहमी पदर.कपाळावर ठसठशीत कुंकू.नेहमी विचरलेले केस. सुंदर भागांची पट्टी. तिला पेपर, पुस्तक वाचनाची खूप आवड होती.रोजचा पेपर नियमित वाचायची. जेवढ काही तिच्या वाचनात चांगलं येईल ते शोधून सूना आणी नातवंडाना वाचायला देयची. वाचा, यांतून बोध घ्या,असा प्रेमळ सल्ला देयची. यातून ती विचाराची पेरणीच करत होती. घरात सतत दवाखाना होता म्हणून तिने कधीच अंधश्रधेला थारा दिला नाही. तिने माणसात देव शोधला. विज्ञान आणि अध्यात्माची सांगड तिच्याकडे होती. कुटुंबात माझ्यावर सर्वात जास्त तिचा जीव होता. माझ्या मनातल मी न सांगता ओळखायची. माझ सुख, दुख, मनात चाललेला संघर्ष, वेदना, आर्थिक ओढाताण चेहऱ्यावरून ओळखायची. आधार देयची. पंधरा वर्षे प्रत्येक गोष्ट, घटना तिच्याशी शेअर करत होतो. तिच्यापासून काहीच लपवून ठेवाव असं कधीच वाटलं नाही. तिला विचारल्याशिवाय कोणतच पाऊल टाकल नाही.कामासाठी सकाळी घरातून बाहेर पडल्यानंतर सायंकाळी घरी वाड्याच्या पायरया चढत चढत तोंडातून "आई" अशी हाक जायची. जनु सवयच लागली होती. ती कुठेही खोलीत,माळीत, सोफ्यात बसली असेल तिथून"ओं" म्हणून हाक देयची. आई दिसली नाही तर जिव कासावीस व्हायचा. ती दिसेनाका "आई" कुठं गेली असा प्रश्न घरातल्यांना ठरलेला होता. दिवसभरातील काम आणि इतर गोष्टीवर गप्पा मारत बसत होतो. माझं मन तिच्यासमोर मोकळं करायचो. मी आईचे काळीजच होतो. मला साध गरगरलं तर तिला तिचा जीव गेल्यासारख व्हायचं.खूप काळजी घेयची माझी. काटा माझ्या पायात मोडायचा, तेव्हा तिच्या काळजाला वेदना व्हायची.. किती जीव लावावा, प्रेम कराव याला सिमाच नव्हती. खरंच माझ्या माऊलीच्या प्रेमाला मर्यादा नव्हती. अशी आई मला मिळाली. खरोखरच मी खूप खूप भाग्यवान समजतो स्वताला. २००३ मध्ये वडिलांना परेलसचा तीव्र झटका आला. आणि तेथून आमच्या कुटुंबाचा संघर्ष सुरू झाला. २००५ मध्ये पुन्हा वडील गंभीर आजारी पडले. २००९ मध्ये माजी वाल रिप्लेसमेंट ओपन आर्ट सर्जरी झाली.२०११ पुन्हा वडिलांची सर्जरी.२०१३ भावाची एन्जोप्लास्टी. २०१५ पुन्हा एक धक्का. या सततच्या तणावामुळे आईचा बिपी बरेच दिवस जास्त राहिला. गोळ्या सुरू होत्या. पण कालांतराने त्या बदलाव्या लागतात. ती दवाखान्यातच यायची नाही. गोळ्या बदल केला नाही. त्याचे शरीरवर दुष्परिणाम झाले होते. जेव्हा आम्ही डॉक्टरांना दाखवायला गेले तेव्हा सर्व तपासण्या आणि चाचणी केल्या आणि डॉक्टरांनी जे सांगितले ते ऐकून माझ्या पायाखालची वाळू सरकली. कसेतरी तीन महिने एवढीच सोबत राहील असं डॉक्टरांनी सांगितलं आणि कानात गरम शिश टाकल्यासारख्या मनाला असह्य वेदना झाल्या. आणि तिथून पुढे पुण्याला उपचार सुरू केले. पंचकर्म ऍलोपॅथी होमिओपॅथी सारे उपचार करत होते. अवघ्या तीन महिन्यात तब्येत सुधारत गेली आणि एका विशिष्ट टप्प्यावर स्थिर झाली. सहा महिन्यानंतर दुसऱ्या समस्या निर्माण झाल्या. शरीरात रक्ताची निर्मिती पूर्ण थांबली होती. दर पाच दिवसाला रक्त वाढीसाठी अत्यंत महागडी अशी अर्थ प्रोटीनची इंजेक्शन सलाईट मधून सुरू केली. त्यादरम्यान सहा ते आठ एचबी राहत होता. पुण्याच्या वाऱ्या सुरू होत्या. सार दीड वर्षे सुरळीत चालू होता.जानेवारीत सायंकाळी वडील नेहमीप्रमाणे जेवण करून वाडयाबाहेर खुर्चीवर बसले होते. येणारया जाणारया लोकाशी बोलत बसायची त्यांना नेहमी सवय होती त्यादिवशी नेहमीप्रमाणे जेवण करून बसले होते अचानक बसलेल्या जागेवरच गप्प झाले. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यातच आईही गेली. एका रात्री बाथरूमला गेली होती. ती उठताना हात घसरून पडली आणि माकड हाड क्रॅक झाल. झटक्यात एच.बी. कमी आला. तिच्या शरीराने वरून रक्त देण्याचा प्रयत्नाला प्रतिसाद दिला नाही.असह्य वेदना सुरू झाल्या होत्या. एक एक मार्ग बंद होत होतं सर्व मार्ग बंद झाले होते. माझ्यासमोर सार चित्र स्पष्ट दिसत होत. आणि अवघ्या दहा दिवसात 'ती' गेली. तीच जाण खूप वेदनादायक होत. ती दुपार होती,,,,, देवघरात निरांजन शांत जळत होती,,,इकडे आई हॉलमध्ये होती. आम्ही सारेच तिच्या भवती होते. तिने एक दिर्घ श्वास घेऊन "ती" कायमची विझली होती. देवाघरी कायमची निघून गेली होती. तिचे शेवटचे आठ दिवस,,,, आठवले तर अंगाचा थरकाप उडतो. माझ्यासाठी तेव्हा दिवस नव्हताच. रात्रच माझा दिवस झाला होता. पूर्ण जगाशी संपर्क तुटला. फक्त आणि फक्त आई आणि आईचं. रात्री नऊ वाजता जेवण करून तिच्या शेजारी रात्रभर बसून रहायचं.सादी मासी बसणार नाही एवढी काळजी घेयचो. कारण आईची हालचाल झाली तर तिला वेदना होत होत्या. तिची कमीत कमी हालचाल होण्यासाठी आमची धडप होती. प्रत्येक हालचालींला तिला वेदना व्हायची. ती होऊ नये म्हणून डोळ्यात तेल घालून बसायचो. सकाळी कुटुंबातील इतरांची आवराआवर झाली का ते यायची आणि मी सकाळी सहा वाजता झोपायचो. दुसरा पर्याय नव्हता. सारे रस्ते कायमचे बंद झाले होते. शेवटची रात्र,,,तर खूप भयानक,,, वेदनेचा कडेलोट झाला होता. पाहवत नव्हत. प्रत्येक वेळी ती म्हणायची "मला" आत्ता जाऊ दे. खूप झाले. मी तिला आम्हाला अजून थोडीच तुझी सोबत हवी आहे म्हणायचो. तसं ती थांबायची. त्या शेवटच्या रात्री आईने माझी सहमती मिळवली होती. तिने सहमती मागीतली होती. तिच्या असहाय वेदना पहावत नव्हत्या. तोंडातून एकही शब्द न काढता डोळ्यातील अश्रूना आवरत मान हालवून होकार दिला आणि माझा बांध फुटला. रात्रीचे दोन वाजले होते. माझ्या डोळ्यातून अश्रू घळघळत होते. तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हता. आईचा हात माझ्या हातात होता... आईच्याही डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या होत्या. अडीच वाजले असतील,,, कानावर कुत्र्याच्या भुकण्याचा आवाज येत होता. मला काहीच सुचत नव्हतं. तेवढ्यात आई बायको माझ्या जवळ येऊन उभा राहिली होती. माझ्या खांद्यावर हात टाकला,,,, आईला दिसणार नाही याची काळजी घेऊन मी तिच्या कुशीत तोंड लपवून खूप खूप रडलो,,, पत्नी सुध्दा.... त्यावेळी आईला सार काही समजत होत. त्यानंतर आई मात्र शांत होत गेली. सकाळी मीच आत्ता गोळ्या देऊ नका,असं घरच्यांना सांगीतलं. आई घर भरून बघत होती. साडेनऊ नंतर डोळे कधी कधी झाकायची सुरूवात केली. काही वेळातच पुर्ण डोळे झाकले. श्वासोच्छ्वास सुरू होता. तो पर्यंत भाऊ गावातीलच डाक्टरला घेऊन आला होता. श्वास सुरू होता. पणमला सारं समजलं होतं. डाक्टराना तपासू नका असं सांगितलं पण इतरानी ऐकलं नाही. डाक्टरने बी.पी. चेक केला आणि कोणालाही काहीही न बोलता गेला. ती शांत झाली होती. वेदना कमी झाल्या होत्या. आम्ही सारेच तिच्या भोवती बसून होतो. तिचा त्रास खूप कमी झाला होता. ती शांत वाटत होती.. भाबड्या मनाच्या एका कोपऱ्यात आसेचा किरण दिसत होता,,,,पण,,,, सत्य अटळ होत. पहायला आलेल्या कुणीतरी महिलेने देवारयावर निरंजन लावायला सांगितल. तसं नेहमीप्रमाणेच सकाळीच देवारयावर आरती लावली होती. घरच्यांनी पुन्हा नऊ वाजता तेल घातले,,, पुन्हा बारा वाजता तेल घातले. निरांजन शांत जळत होती,,, आईही निरांजनासारखी शांत होत चालली होती... सव्वा दोन वाजता एक दिर्घ श्वास घेऊन तेवढ्यच गतीने सोडला,,,,,ती अनंताच्या प्रवासाला निघाली. काही वेळात शरीरानेही गेली. असं म्हणतात की, चांगली माणसं देवालाही आवडतात. या दिवसी देवाने माझ्या देवारयातील देव कायमचा चोरून नेहला होता,,, त्या दिवशी देवच माझा चोर झाला होता.माझा देव्हारा मोकळा झाला होता. पण तिचे संस्कार आणि आशिर्वाद आमच्या सोबत कायमचे होते. ती मला म्हणायची,"आम्ही दोघेपण(वडिलांसह) बिनकामाची माणसं झालो आहे. कशाला एवढं पैस घालतो. राहू दे. भरपूर जगलो. आत्ता कशाचीच अपेक्षा राहिली नाही. तुझा प्रपंच तु आत्ता बघ.दवाखान्यात पैसा घालणं थांबव. मी तिला म्हणायचो,,,, आई, माणूस जिवंत आहे तो पर्यंतच माणसानं माणसासाठी सारं काही करावं. एकदा गेला की परत त्याच्या वजनाऐवढे पैसे घातले तरी एक तासही तो माणूस परत येत नाही.माणसासाठी जिवंतपणी खर्च करावा,,, गेल्यावर पाच पक्वानाचे गावभर जेवण घातलं तरी गेलेल्या माणसाच्या तोंडांत एक घासही जात नाही. मी तर किरकोळ खर्च करतोय. त्यामुळे तुम्ही मला साथ देताय,,, त्यामुळेच मी कमवतोय. मी हे बोलायचो तसच आई शेजाऱ्या पाजाऱ्यांना आणि नातेवाईकांना अभिमानाने सांगायची. आईनं प्रेम करायला शिकवलं. जिव लावायला शिकवलं. माणसाचा जन्म परत आहे का नाही माहित नाही,, म्हणून याच जन्मात खूप खूप प्रेम करा. जिव लावा.
करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...
खूप छान लेखन. आपण शब्दबद्ध केलेली आपली आई समजून घेताना दोनदा डोळ्यातून पाणी आलं. नातेवाईकांना जीव लावणारी, वेळप्रसंगी त्यांची रात्रंदिवस सेवा करणारी आपली आई काही निवडक आया पैकी एक आहे. असं मला मनोमन वाटतं. आपलं लेखन वाचताना उत्तम कांबळे सरांचे आई समजून घेताना या पुस्तकाची पुन्हा पुन्हा आठवण होत होती. खूप सारे बारकावे आपण हळव्या मनाने आणि जबाबदारीने टिपले आहेत. काही किरकोळ शुद्धलेखनाच्या त्रुटी राहिल्या आहेत त्या दुरुस्त करता येतील.
उत्तर द्याहटवाआपण लिहावं .. लिहित व्हावं. असे ललित लेख आपण खूप छान लिहिता आहात. आपण लिहा आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी सदैव राहतील.